रयतेला संकटातून मुक्त करणाऱ्या माँसाहेब जिजाऊ प्रजाहितदक्ष राजमाता -प्रा.अरुण बुंदेले

32

🔹फुले -शाहू -आंबेडकरी अनुयायांनी केले माँसाहेब जिजाऊंना अभिवादन

✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अमरावती(दि.18जून):-” हिंदवी स्वराज्यामध्ये माँसाहेब जिजाऊ यांनी शिवरायांसारखा युगपुरुष निर्माण करून एका नव्या युगाची निर्मिती केली. स्वराज्याचा राज्य कारभार समर्थपणे सांभाळला.
लाव्हारसाचे अलंकार धारण करून वीरमाता बनल्या. रयतेला संकटातून मुक्त करणाऱ्या प्रजाहितदक्ष राजमाता म्हणजे माँसाहेब जिजाऊ होत.”असे विचार साहित्यिक प्रा. अरुण बुंदेले यांनी ऑनलाइन भाषणात व्यक्त केले.

ते स्थानिक किशोर नगर येथील वऱ्हाड विकास येथे राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या प्रमुखवक्ते पदावरून ऑनलाईन बोलत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजभूषण प्रा. श्रीकृष्ण बनसोड (अध्यक्ष, उपेक्षित समाज महासंघ ), प्रमुख वक्ते समाजप्रबोधनकर्ते प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले (अध्यक्ष, कै मैनाबाई बाबारावजी बुंदेले प्रतिष्ठान, अमरावती) तर प्रमुख अतिथी सौ.सारिका शरदराव बढे, माजी नायब तहसीलदार श्री बाबाराव गावंडे, पोलीस पाटील सौ. कविता नरेंद्र पाचघरे (बोरगाव धर्माळे ),सौ.नंदा श्रीकृष्ण बनसोड,श्री गुणवंतराव जळीत, सौ. भाग्यश्री संदीप जळीत होते.

सर्वप्रथम अध्यक्ष,प्रमुख वक्ते व प्रमुख अतिथी यांनी राजमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून अभिवादन केले आणि अभंगकार प्रा.अरुण बुंदेले यांनी “राजमाता माँसाहेब” या
” निखारा ” या काव्यसंग्रहातील स्वरचित वंदनगीताचे ऑनलाईन गायन करून कार्यक्रमाचा ओनामा केला .

कार्यक्रमाध्यक्ष समाजभूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड यांनी शहाजी राजांनी पुण्याची जहागीर बाल शिवाजींच्या सुपूर्द केली होती. शहाजी राजेंच्या सांगण्यावरून जिजाऊ माँसाहेब आणि बाल शिवाजी उद्ध्वस्त झालेल्या पुण्यात दाखल झाले. एखाद्या पुरातन शहरात प्रवेश केल्याचा भास होत होता. येथे वस्ती करणाऱ्यांचा निर्वंश होईल असे बोलले जात होते. माँसाहेबांनी न घाबरता अंधश्रद्धांचे जोखड झुगारून स्वराज्याची उभारणी केली.” असे विचार व्यक्त केले .कार्यक्रमाचे संचालन सौ. ज्योती राहूल काळे व सौ. मानकर यांनी केले तर सौ.प्रगती सचिन जळीत व श्लोक विजय गावंडे यांनी आभार मानले..
कार्यक्रमाला फुले -शाहू – आंबेडकर अनुयायी उपस्थित होते .