बाभुळगाव येथे श्री गजानन महाराज मंदिरात पहिला वर्धापन दिवस होणार उत्साहात साजरा

43

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगाव(दि.20जून):-तालुक्यांतील बाभूळगाव येथे श्री गजानन महाराजांचे भव्य, दिव्य असे मंदिर असून मंदिरात श्री गजानन भक्त परिवारातर्फे अनेक विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात असते. या श्री गजानन महाराजांच्या मंदिरास एक वर्ष पूर्ण होत आहे. त्या निमित्याने 20 जून रोजी पहिला वर्धापन दिवस मोठ्या थाटात साजरा करण्यात येत आहे. कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे आहे.

19 जून सोमवार रात्री 9 ते 20 जून रोजी मंगळवार पहाटे 5 वाजेपर्यंत अखंड माळजप, 20 रोजी मंगळवारी सकाळी 05:05 वाजता अभंग स्नान सकाळी 7.30 ला श्रींची आरती व 8 वाजता रुद्राभिषेक 10.30 वाजता नैवेद्य दुपारी 11.30 ला ध्वजारोहन संध्याकाळी 6 वाजता श्रींची महाआरती नंतर 6:30 ला महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री गजानन परिवारातर्फे करण्यात आले आहे.