राज ठाकरे व मनसे सामाजिक हित जपणारा पक्ष-शिक्षण विस्तार अधिकारी गणपत लटपटे

58

🔹महातपुरी येथे शालेय साहित्य वाटपाचा दुसरा टप्पा संपन्न

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.20जून):-मनसे नेते दिलीप धोत्रे, सरचिटणीस संतोष नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परभणी जिल्हा संघटक बालाजी मुंडे यांनी राजसाहेब ठाकरे यांच्या ५५ व्या.वाढदिवसानिमित्त १०५५ गरजू विद्यार्थ्यांना संपूर्ण सप्ताहभर शालेय साहित्याच्या वाटपाचा निर्धार केला होता या सप्ताहाची सुरुवात दिन.15 जून रोजी शहरातील प्रेरणा शाळेतून करण्यात आली होती त्याचाच दुसरा टप्पा म्हणून दि.19 रोजी तालुक्यातील सर्वात जास्त विद्यार्थी पटसंख्या असणारी महातपुरी येथील जी.प. शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उपाध्यक्ष यादव महात्मे,मनविसे जिल्हाध्यक्ष प्रशांत(मुन्ना)बिराजदार,मनशेसे तालुकाध्यक्ष हनुमान डबडे,मनविसे तालुकाध्यक्ष राहुल चव्हाण,तालुकाउपाध्यक्ष निखिल राठोड,सामाजिक कार्यकर्ते लालू जाधव, शिक्षण विस्तार अधिकारी गणपत लटपटे, केंद्रप्रमुख कोकाटे, सरपंच प्रल्हाद शिंदे, उपसरपंच किरण चाफळे,आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी गंगाखेड पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी गणपत लटपटे यांनी आपल्या मनोगत व्यक्त करत म्हटलेकी राजसाहेब ठाकरे व त्यांचा मनसे पक्ष सर्वसामान्य माणसांचा हित जपणारा पक्ष असून महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वोत्तपरी कार्य करत आहेत गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करणे कौतुकास्पद कार्य करत आहेत.

तसेच इतर मान्यवरांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले व राज ठाकरे व बालाजी मुंडे यांचे आभार मानले.यावेळी बालाजी मुंडे यांनी उपस्थिताना मार्गदर्शन करत असे म्हटले की सध्या राज्यामध्ये इंग्रजी शाळांचा पेव फुटला असून या खाजगी शाळांनी शिक्षणाचा धंदा करून टाकलाय आज पाहिलं असता भारत देशात किंवा महाराष्ट्रात जे कोणी अधिकारी झाले असतील डॉक्टर, इंजिनियर, तहसीलदार , शिक्षक, कलेक्टर ,पोलीस हे सर्व जिल्हा परिषद शाळेमधूनच शिकून आलेले आहेत खाजगी शाळांचा धंदा थांबवायचा असेल तर सर्व पाल्यांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकवावे जेणेकरून आपल्या जिल्हा परिषद शाळा टिकतील. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक लांडगे सर, सोनवणे सर ,राठोड सर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमजद शेख व सर्व शिक्षक वृंद तसेच
महाराष्ट्र सैनिक मुंजाजी मुळे ,राहुल राठोड आदींनी परिश्रम घेतले