घुग्घुस येथे भाजपातर्फे जागतिक योग दिवस

33

🔸शरीराला निरोगी ठेवण्यासाठी योग करा- देवराव भोंगळे

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.22जून):- येथील प्रयास सभागृहात बुधवार, २१ जून रोजी सकाळी भाजपातर्फे जागतिक योग दिवसानिमित्त योग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. स्वागत गीत गाण्यात आले. गुरुदेव सेवा मंडळ, सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळ, मॉर्निंग वॉक ग्रुप, फ्रेंड्स मॉर्निंग ग्रुप, महिला पतंजली योग समिती, प्रयास योग समिती व शिक्षकवृंद यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले, योग ही आपली प्राचीन संस्कृती आहे. योगाला जगाच्या पाठीवर नेण्याचे काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पहिला जागतिक योग दिवस २१ जून २०१५ पासून सुरु झाला तेव्हा पासून योगाला चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. आज जगभरात योग दिवस साजरा केला जातो. सर्व जाती धर्माचे लोक योगाकडे वळत आहे शरीराला व स्वतःला सुदृढ ठेवण्यासाठी दररोज योगा करणे आवश्यक आहे. याप्रसंगी सर्वांनी योगाचे विविध आसने केली व कार्यक्रमाचे समापन करण्यात आले.

संचालन पतंजली योग समितीचे अनिल नित यांनी केले.

यावेळी गुरुदेव सेवा मंडळाचे प्रेमलाल पारधी, मधुकर मालेकर, विनोद चौधरी, मुस्तफा शेख, तुलसीदास ढवस, जनाबाई निमकर, माया ठेंगणे, विना घोरपडे, सुमन वऱ्हाटे, सखुबाई बोबडे, वैशाली ढवस, संजय भोंगळे, हेमराज बोंबले, रवी चुने व मोठया संख्येत नागरिक उपस्थित होते.