योग शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद,मुलांचाही सहभाग

39

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.22जून):-आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून गंगाखेड विधानसभेचे विद्यमान आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी शहरातील स्व.गोपीनाथजी मुंडे अन्नछत्रालयात आयोजित केलेले योग शिबिरास लोकांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाल्याने अतिशय आनंदी वातावरणात योग कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये शहरासह परिसरातील अनेक नागरिक, महिला, तरूण, तरूणी व मुलांचाही सहभाग लक्षणीय होता.

राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत २१ जून हा दिवस जगभर आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. ‘हर घर अंगण योग’ ही टॅगलाईन व वसुधैव कुटुंबासाठी योग ही संकल्पना घेऊन आ.डॉ.गुट्टे दरवर्षी योग शिबिराचे यशस्वी आयोजन करतात. सहभागी शिबिरार्थींना चहापान, अल्पोपहार आणि चांगली बैठक व्यवस्था केली जाते. त्यामुळे लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो.

लोकांचे आरोग्य सुदृढ आणि दैनंदिन जीवनशैली तंदुरुस्त रहावी, यासाठी योग महत्त्वाचा आहे. शारीरिक स्वास्थासह मानसिक, सामाजिक व आध्यात्मिक आरोग्यासाठी योगाची गरज असते. दैनंदिन कामातील धावपळ व ताणतणावामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय विकार तसेच नैराश्य सारखे आजार वाढत आहेत. त्यामुळे प्रत्येकांनी दररोज योगा करायला हवी, अशी अपेक्षा मुख्य आयोजक आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी मुंबई येथून भ्रमणध्वनीद्वारे दिलेल्या शुभेच्छा संदेशात व्यक्त केली.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य किशनराव भोसले, माजी उपनगराध्यक्ष राधाकिशन शिंदे, विधानसभा अध्यक्ष कृष्णाजी सोळंके, सामाजिक कार्यकर्ते बाबा पोले, निखिल वंजारी, उद्धव शिंदे, सचिन महाजन, सचिन नाव्हेकर, वैजनाथ टोले, जनसंपर्क अधिकारी हनुमंत लटपटे, स्वीय सहाय्यक बाळासाहेब पवार, कवी विठ्ठल सातपुते, प्रभाकर सातपुते, ऍड.मिलिंद क्षीरसागर, पत्रकार पिराजी कांबळे, माजी सुभेदार विश्वनाथ सातपुते, अंकुश मदनवाड, दादा कापसे, माणिक नागरगोजे, अश्विन कदम, दुर्गेश वाघ, गणेश मिजगर यांच्यासह योगप्रेमी उपस्थित होते.