ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात बलिदान दिवस

31

🔹डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी कलम ३७० विरोधात पहिला आवाज बुलंद करणारे महान देशभक्त – देवराव भोंगळे

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.23जून):- येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात शुक्रवार, २३ जून रोजी सकाळी एक देश मे दो विधान, दो प्रधान, दो निशान नही चलेंगे चा नारा देणारे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा बलिदान दिवसानिमित्त अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.

भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले, जम्मू काश्मीर मधील कलम ३७० विरोधात भारत देशात पहिला आवाज बुलंद करणारे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी होते. यासाठी देशभरात एक चळवळ उभी केली देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंच्या पुढाकाराने काश्मीरला मिळालेले ३७० चे सुरक्षा कवच मात्र मुखर्जीना मान्य नव्हते. ३७० कलमविरोधात ते नेहरू सरकारमधून बाहेर पडले आणि आंदोलनाला धार देण्यासाठी एक देश मे दो विधान, दो प्रधान, दो निशान नही चलेंगे असा नारा दिला त्यांनी काश्मीरात जाऊन आंदोलन करण्याची घोषणा केली. आंदोलनासाठी जात असतांना तत्कालीन काश्मीर सरकाने मुखर्जीना अटक केली नजरकैदेत असतांना त्यांच्या मृत्यू झाला त्यांच्या स्मृतीस मी अभिवादन करतो.

यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, चिंचोळकर महाराज, अमोल तुलसे, सुनंदा लिहीतकर, शीतल कामतवार, नेहा कुम्मरवार, खुशबू मेश्राम, स्वाती गंगाधरे व नागरिक उपस्थित होते.