कारंजा घा. येथे अक्षय भालेराव ,हिना मेश्राम , साक्षी यांच्या हत्येचा जाहीर निषेध

26

✒️कारंजा(पुरोगामी न्युज नेटवर्क)

कारंजा(घा)(दि.25जून):-अक्षय भालेराव ,हिना मेश्राम, साक्षी (दिल्ली) यांच्या हत्ये प्रकरणी जाहीर निषेध नोंदवून गुन्हेगारांना फाशीच्या शिक्षेची मागणी कारंजा येथील यिन क्लब शाखेने निवेदनाद्वारे केली.

नांदेड येथील बोंढार हवेली गावातील अक्षय श्रावण भालेराव या तरुणाचा तसेच सावित्रीबाई फुले वस्तीगृहात राहून इंजिनिअरिंगला मुंबई येथे शिकत असलेली अकोल्याची मुलगी हिना मेश्राम यांचा जातीवादी मानसिकतेतून झालेल्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ दोषींना कठोर शिक्षा व्हावी तसेच प्रेम प्रकरणातून दिल्ली येथे साक्षीचा खून करण्यात आला तिच्या मारेकर्याला देखील कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी कारंजा घा.येथील यिन क्लबच्या सदस्यांनी तहसील कार्यालय समोर या घटनेचा निषेध करून तहसीलदारांना निवेदन दिले .यावेळी अनेक सामाजिक संघटनांनी यात सहभाग नोंदविला.

नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली गावात पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना घडली आहे. तसेच आंबेडकर जयंतीच्या कारणावरून अक्षय भालेराव याचा द्वेष मनात ठेवून जातीय मानसिकतेतून नऊ जणांनी त्याची चाकूने भोसकुन हत्या केली .त्यापैकी आठ जण अटकेत असून एकाला अद्याप अटक झालेली नाही. अक्षयच्या कुटुंबावर सुद्धा दगडफेक झाल्याने त्यांना पोलीस संरक्षण मिळाले पाहिजे .त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले वस्तीगृहातील मुंबई येथे इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणारी हिना मेश्राम ही मुलगी हिच्यावर तेथील सुरक्षा रक्षकाने बलात्कार करून तीचा खून करण्यात आला.

अशा प्रकारचे जातीय अन्याय अत्याचार पुन्हा पुन्हा घडू नये व मृतक अक्षय भालेराव व हिना मेश्राम यांच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करून पीडित कुटुंबांना न्याय मिळवून द्यावा. अक्षय व हिनाच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी द्यावी व त्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी 50 लाख रुपये आर्थिक मदत शासनाकडून मिळावी व इतर मागण्यासाठी कारंजा घा.च्या तहसीलदारा मार्फत मुख्यमंत्री /गृहमंत्री /राज्यपाल /महाराष्ट्र शासन यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळी राजेश घाडगे रोहयो योजना फलउत्पादन मंत्री महाराष्ट्र राज्य यिन,राहुल मानमोडे, मयूर किनकर, दिपाली बारंगे, रीपल डोंगरे , पवन गिरडकर,दीपक राठोड, प्रविण ठवले,तुषार नेहारे,तुषार घाडगे,मनीष रेवतकर,भूषण मानमोडे,विलास का, धर्मेंद्र युवणाते,राजू घागरे यांनी सहभाग नोंदविला.