आमदार दादाराव केचे यांच्या उपस्थितीत गुरुकुल पब्लिक स्कूलच्या प्रंगणावर योग दिवस संपन्न

42

✒️कारंजा(पुरोगामी न्युज नेटवर्क)

कारंजा(घा)(दि.25जून):- मोदी 9 जनसंपर्क अभियान अंतर्गत भाजपा आर्वी विधानसभेचा योग दिवस गुरुकुल पब्लिक स्कूल कारंजा समोरील प्रांगणावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाला आमदार दादाराव केचे, तहसीलदार ऐश्वर्या गिरी, भाजपा तालुका अध्यक्ष मुकुंदा बारंगे, महाराष्ट्र प्रदेश सचिव सरिता गाखरे , आर्वी विधानसभा निवडणूक प्रमुख प्रल्हाद नांदुरकर, शहर अध्यक्ष दिलीप जसुतकर, ज्योती यावले, जिल्हा परिषद सदस्या नीता गजाम, भाजपा महिला आघाडी तालुका अध्यक्षा रजनी मांनमोडे, रेवता धोटे, योग प्रशिक्षक राजू पालीवाल,भारती पालीवाल, सहप्रशिक्षक धांदे, वरेकर, शरद बोके, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सचिव अजय भोकरे, कारंजा शहराचे नेते किशोर भांगे, नगरसेविका रमा दुर्गे, उषा चव्हाण , योगिता कदम, सुवर्णा कावडकर , नगरसेवक राहूल झोरे, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उपस्थित सर्व पाहुण्यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून योग दिनाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद बोके सर यांनी केले. योग दिनानिमित्त भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, कारंजा शहरातील योग प्रेमी, कारंजा शहरातील नागरिक, राष्ट्रीय सेवक संघाचे स्वयंसेवक, गुरुकुल पब्लिक स्कूलचे विद्यार्थी तसेच अनेक नागरिक उपस्थित होते.

उपस्थित सर्वांनी योग साधनेचा लाभ घेतला. 9 आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने योग्य प्रशिक्षक राजू पालीवाल यांनी उपस्थिताना विविध प्रकारचे योग, प्राणायाम, तसेच सूक्ष्म प्राणायाम आधीचे प्रशिक्षण दिले..त्याचप्रमाणे नियमित योग केल्याने मानवाच्या शरीरामध्ये तसेच दैनंदिनी जीवनामध्ये कसा अमुलाग्र बदल घडवून येतो याचे महत्त्व पटवून दिले..

आमदार दादाराव केचे यांनी मार्गदर्शन करताना योग दिनाचे महत्त्व पटवून देताना सांगितले की, शरीर स्वास्थ व निरोगी राहण्याकरिता तसेच प्रतिकारशक्ती वाढविण्याकरता दैनंदिन जीवनामध्ये योग करणे अत्यंत आवश्यक आहे.. तसेच योग हे भारताने संपूर्ण जगाला दिलेली देणगी आहे, योग्य विज्ञान असून संपूर्ण जीवनशैली असल्याचे दादाराव केचे यांनी सांगितले .योग आपणास तणावाकडून आनंदाकडे तसेच नकारात्मक कडून सकारात्मेकडे जाण्याचा मार्ग दाखविणे, असेही आमदार दादाराव केचे यांनी सांगितले.

योगाला आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त झाली असून त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे योगदान आहे. मोदीजींनी योग दिनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन आपल्या संस्कृतीला बहुमान मिळवून दिलेला आहे, असे आमदार दादाराव केचे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन योजना ज्योत्स्ना पठाडे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता गुरुकुल पब्लिक स्कूलचे सर्व पदाधिकारी शिक्षक, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक, नगरसेविका, यांनी सहकार्य केले.