भारतीय बौद्ध महासभेचे राज्यस्तरीय चिंतन शिबिर संपन्न

67

✒️यवतमाळ,जिल्हा प्रतिनिधी(सिध्दार्थ दिवेकर)

यवतमाळ(दि.27जून):-“दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया” अर्थात भारतीय बौद्ध महसभा ” महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा शाखेचे अध्यक्ष, सरचिटणीस, कोषाध्यक्ष तसेच सक्रीय केंद्रीय शिक्षक-शिक्षिका, यांचे राज्यस्तरीय चिंतन शिबिर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, दादर (पूर्व) मुंबई येथे नुकतेच दि. २५ जुन२०२३रोजी संपन्न झाले.

या राज्यस्तरीय चिंतन शिबिराच्या उद्घाटकिय सत्रात “प्रबोधनकराची आचारसंहिता” या विषयावर *डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ. भिमराव य. आंबेडकर (राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष, समता सैनिक दल)* यांनी मार्गदर्शन करतांना आगामी काळात धम्मक्रांती अधीक व्यापक करण्याचा संकल्प करून कालबाह्यकृती रद्द करून संशोधनावर भर देत वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी कटीबंध्द होऊया ! त्या करीता संवादी व्हावे लागेल असा संदेश दिला. दिशादर्शक असे बहुमोल मार्गदर्शन केले.

या चिंतन शिबिरात धम्माचार्य करुणाशील रोशन (दिल्ली) यांनी “महामानवांचा वारसा व इतिहासाच्या पाऊल खुणा” या विषयावर तर कॅप्टन प्रविण निखाडे (ट्रस्टी व आंतरराष्ट्रीय सचिव) यांनी “बीएसआय मिशन तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धम्म क्रांती गतिमान कशी करावी?” या विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले तर “शाखेचा हिशोब व शंका समाधान” या विषयावर ऍड. एस. के.भंडारे (राष्ट्रीय उपाध्यक्ष मुंबई) आणि ऍड.एस. एस. वानखडे (राष्ट्रीय सचिव व केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख) यानी आपल्या विषयाची मांडणी केली.

यावेळी पुज्य भंते बी. संघपालजी, महाथेरो (राष्ट्रीय उपाध्यक्ष व बौद्ध महासभा भिक्खू संघ प्रमुख),जगदीश गवई (राष्ट्रीय उपाध्यक्ष), रागिणीताई पवार (राष्ट्रीय सदस्य व केंद्रीय महिला विभाग उपप्रमुख) इत्यादी मान्यवर विचार मंचावर उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. एच. गायकवाड (राष्ट्रीय सचिव) यांनी केले व आभार प्रदर्शन भिकाजी कांबळे (अध्यक्ष ,महाराष्ट्र राज्य शाखा) यांनी केले.

“दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया च्या इतिहासातील या ऐतिहासिक “चिंतन शिबिरासाठी यवतमाळ जिल्हा (पश्चिम) शाखेचे प्रतिनिधित्व रूपेश वानखडे (सरचिटणीस), राहुल राऊत (कोषाध्यक्ष) तसेच संगीताताई कुंभारे आणि विशाखाताई नन्नावरे (केंद्रीय शिक्षिका) तर यवतमाळ (पुर्व) चे भगवान इंगळे (अध्यक्ष), हरेंद्र जंगले (कोषाध्यक्ष), मगंलाताई इंगळे (केद्रिय शिक्षिका) मुंबई येथे सहभागी झाले .यावेळी राज्यातील सर्व जिल्हा शाखेतील प्रमुख पदाधिकारी व सक्रीय केंद्रीय शिक्षक,शिक्षिका मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.