अवैध गुटखा विक्री करणारे जेरबंद गुन्हेशाखा युनिट क्र. १ नाशिक शहर ची कामगिरी

33

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.29जून):-नाशिक शहर पोलीस आयुक्ता अंकुश शिंदे साहेब यांनी पोलीस आयुक्तालय हददीत पानटप-या व इतर ठिकाणी प्रतिबंधीत पानमसाला, गुटखा विकी करणा-यावर कारवाई करणे बाबत आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने गुन्हेशाखा युनिट क्र. ०१ यांचे कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे आयुक्तालय हददीत माहीती काढत असतांना पोलिस अंमलदार मुक्तार शेख यांना एक इसम प्रतिबंधीत असलेला पानमसाला व सुगंधीत तंबाखू (गुटखा ) अवैद्य विक्री करण्याकरीता वडाळा गाव येथून इंदीरानगर येथे घेवून जाणार असल्याची गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली होती,

त्याप्रमाणे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत व पोलीस अंमलदार यांचे एक पथक तयार करून मिळालेल्या बातमी प्रमाणे खात्री करता मोहम्मद साजीद मोहम्मद नासीर अन्सारी याच्या ताब्यातील होंडा अॅक्टिव्हॉ मोपेड क्रमांक एम.एच / १५ / एच. पी / ३०४० हीचे वर मिळून आलेल्या गोण्या मध्ये विमल पान मसाला, आर. एम. डी. पान मसाला, एम. सेन्टेड तंबाखू गोल्ड, असा प्रतिबंधीत असलेला पानमसाला व सुगंधीत तंबाखू (गुटखा ) किं. रूपये ४९ हजार १५६/- चा माल मिळुन आला.

सदरचा प्रतिबंधित पान मसाला त्याने मोहम्मद दिलशाद इस्लाममुद्दीन मलीक व मोहम्मद जुबेर रियासदअली अन्सारी रा. वडाळागांव, नाशिक यांच्या कडून आणले असल्याचे सांगितलेने त्याचे कडे सदर मुददेमाला बाबत चौकशी करता त्यांचे राहते घरात प्रतिबंधीत असलेला पानमसाला व सुगंधीत तंबाखू (गुटखा ) किं. रूपये ४,४३,४२९/- चा मिळुन आला आहे. असा एकुण ४,९२,५८५/- रूपये किंमतीचा माल हस्तगत करण्यात आला असुन वर नमुद इसमांना पुढील कारवाई कामी इंदिरानगर पोलीस ठाणे चे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी मा. श्री. अंकुश शिन्दे, पोलीस आयुक्त सो. नाशिक शहर, मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त सो (गुन्हे) नाशिक शहर, मा. श्री. वसंत मोरे, सहा. पोलीस आयुक्त साो. गुन्हेशाखा, नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क्र. १ चे वरीष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ सो. सपोनिरी./ हेमंत तोडकर, पोउनि / चेतन श्रीवंत, सपोउनि / येवाजी महाले, सुरेश माळोदे, पोहवा / योगीराज गायकवाड, रामदास भंडांगे, संदीप भांड, धनंजय शिंदे, मोतीराम चव्हाण, महेश साळुंके, पोशि मुख्तार शेख, राहूल पालखेडे, गौरव खांडरे, चालक आण्णासाहेब गुंजाळ यांनी संयुक्तरित्या केलेली आहे.