नाशिक,देवळाली मतदार संघात भारत राष्ट्र समिती पक्षाला उदंड प्रतिसाद

42

🔸केसीआर घालताय महाराष्ट्रातील जनसामान्य, शेतकऱ्यांना साद.डाॅ सुवर्णा दोदे याची माहीती

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.29जून):-देवळाली मतदार संघ,भारत राष्ट्र समिती पक्षाचे कार्य दिवसेंदिवस लोकप्रिय होत वाढत चालले आहे,नाशिक देवळाली मतदार संघाचे लोकप्रिय आमदार दिवंगत आमदार भिकचंदजी दोंदे यांच्या कन्या,भारत राष्ट्र समितीच्या डॉ.सुवर्णा भिकचंद दोंदे यांनी सिध्द पिंप्री येथील विश्वरत्न,भारतरत्न,बोधिसत्व,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्तूप स्मारकाला नतमस्तक होऊन विनम्र अभिवादन करत देवळाली मतदार संघ मतदार नोंदणी अभियानास प्रारंभ केला.

तसेच विंचूरगवळी येथील अतिप्राचीन भगवान महादेवांचे दर्शन घेऊन सिध्द पिंप्री,लाखलगाव,विंचूरगवळी, हिंगणवेढे,कालवी येथे जनसामान्य तळागाळातील जनता,शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या,तसेच तेलंगणा राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री, भारत राष्ट्र समिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.चंद्रशेखरजी राव कशाप्रकारे योग्य योजना राबवून सामान्य जनता व शेतकरी वर्ग यांच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत आणि म्हणूनच तेलंगणा राज्य भारत देशात विकासाने परिपूर्ण असे प्रथम राज्य ठरले आहे,आणि तसेच मजबूत कार्य नाशिक देवळाली मतदार संघात तळागाळातील जनसामान्य लोकांसाठी करण्याची इच्छा व ध्येयधोरणे राबविण्यासाठी सदैव कटिबध्द आहोत असे प्रतिपादन डॉ.सुवर्णा भिकचंद दोंदे यांच्यावतीने करण्यात आले.

यावेळी सिध्पिंप्री,लाखलगाव,विंचूरगवळी,हिंगणवेढे,कालवी येथून भारत राष्ट्र समिती पक्षाच्या किसान रथाचे जनसामान्य तळागाळातील जनतेचा व शेतकरी वर्गाने मोठ्या उत्साहात स्वागत करत उदंड प्रतिसाद दिला.