येवला बसस्थानकावर भरदिवसा चोरट्यांने चालत्या बसमध्ये केली मोबाईलची चोरी

27

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.29जून):-येवला शहरातील बस स्थानकावर भरदिवसा चालत्या बसमधून मोबाईल चोरीला गेल्याची घटना नुकतीच उघडकीस झाली.नाशिक-शेगांव या मार्गाची बस क्रमांक ४७०९ या बस मधून प्रवास करत असलेले अशोक संकलेचा या प्रवाशाचा मोबाईल चोरतांना चोरी करणारा इसम रंगेहात‌ पकडण्यात आला.शेगाव ते नाशिक बस ही येवला बसस्थानकावर परतीचा प्रवास करत असतांना अशोक संकले यांचा मोबाईल चोरी गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर मोबाईलची चोरी करणारा चोर हा बस मधलाच कोणीतरी प्रवासी असू शकतो.

असा संशय आल्यामुळे मोबाईल चोरीची चौकशी करण्यात आली असतांना संशयित चोराच्या हालचालीवरून तसेच काही प्रवासांना चोर मोबाईल काढतांना आढळून आला होता.तर ज्यांचा मोबाईल चोरीला गेला होता.ते अशोक संकले यांनी त्यांचे सहकारी मित्र संजयभाऊ सोमासे यांना तात्काळपणे सांगितलं हा चोरट्यां माझा मोबाईल चोरी करून पळत आहेत.म्हणून प्रवाशांनी व संजयभाऊ सोमासे यांनी एकत्रित येऊन त्या मोबाईल चोरास रंगेहाथ पकडले या इसमाचे नाव मोसिन युनूस खान (वय वर्ष१९)याला बसच्या खाली उतरून व त्याच ठिकाणी बस स्थानकावर गस्त घालत असलेली येवला शहर पोलीसाच्या व्हॅनला जवळ बोलून संजय भाऊ सोमासे सामाजिक कार्यकर्ते संतोष गायकवाड व इतर येवला बस स्थानक फेरीवाले यांनी त्या चोराला पोलिसांच्या ताब्यात दिले.

तर या मोबाईल चोरास येवला शहर पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम व त्यांचे पोलीस कर्मचाऱ्यांनी मोबाईल चोरास ताब्यात घेऊन त्याच्यावर कलम ३७९ व ५११अशा प्रकारचा मोसिन युनूस खान या इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापुढील तपास व कारवाई येवला शहर पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम व पोलीस कर्मचारी करत‌ आहे.येवला बसस्थानकावरील कर्मचाऱ्यांना व प्रवाशांना वारंवार सूचना देण्यात येतात की बस मध्ये प्रवास करत आपले खिसे पाकिटे व मौल्यवान वस्तू आपल्या जबाबदारीवर सांभाळून ठेवावे व चोरांपासून सावध राहावे.असा संदेश वारंवार येवला बसस्थानकातून देण्यात येत असतो.