रुग्ण हक्क समिती तर्फे डॉक्टरांचा सत्कार

31

✒️खामगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

खामगांव(दि.3जुलै):- दिनांक 1 जुलै रोजी डॉक्टर डे निमित्त रुग्ण हक्क संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष अँड निलेश करमुडी आणि प्रदेशाध्यक्ष हणमंत गोत्राळ यांच्या नेतृत्वात रुग्ण हक्क संरक्षण समिती खामगांव बुलढाणा जिल्हा संघटक सुरज यादव, सुनिल राऊत, सिद्धेश्वर निर्मळ, रवी माळवंदे, सुधीर टिकार, सुमेध इंगळे, प्रेम भारसाकळे, रोशन गोळे, अजय जाधव, सुनिल कौलकार, सुरज इंगळे, जितु इंगळे, सुरज वानखडे, दिपक भगत, रविंद्र दिपके, अमित इंगळे, आनंदसिंग चव्हाण, शुभम शमी, सोनू चव्हाण तालुका शहर पदाधिकारी यांच्या वतीने डॉक्टर्स डे निमित्ताने खामगांव शहरातील गरीब गरजू रुग्णांना प्रामाणिक पणे सेवा देणारे सामान्य रुग्णालयातील काही व तसेच खाजगी रुग्णालय मधील प्रामाणिक सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा दवाखाण्यात जाऊन त्यांचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन सोहळा संपन्न झाला.

कार्यक्रमाचे आयोजन सुरज यादव यांनी केले होते सर्व प्रामाणिक डॉक्टरांना डॉक्टर्स डे निमित्त शुभेच्छा रुग्ण हक्क संरक्षक समितीच्या वतीने रूग्णांना अविरत सेवा देणाऱ्या डॉक्टरांचे आभार सुद्धा समिती तर्फे रुग्ण सेवकांनी मानले अशी माहिती रविंद्र दिपके यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.