5 जुलै रोजी राहत क्लिनिक उमरखेड येथे आरोग्य तपासणी शिबिर

42

[राहत क्लीनिक व आयकॉन हॉस्पीटल चा उपक्रम]

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि. 4जुलै):-सामाजिक संघटना जमाते इस्लामी हिंद मार्फत चालविण्यात येणाऱ्या राहत बहुउद्देशिय संस्था अंतर्गत राहत क्लीनिक व आयकॉन हॉस्पीटल पुसद यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनाक 5 जुलै गुरुवार रोजी सकाळी 10.30 वाजता आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन राहत क्लीनिक नांदेड रोड, बजाज शो रूम च्या बाजुला करण्यात आले आहे.

या शिबीरात छातीरोग , हृदयरोग , थॉयराइड , बालरोग व स्त्रीरोग आजारावर तज्ञ डॉक्टर्स तर्फे तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

डॉ. राहुल व्ही. जाधव ( मेडीसीन) हृदय रोग , मधुमेह , थॉयराइड तज्ञ व सल्लागार चिकित्सक), डॉ.सुदर्शन ठाकरे, एम.बी.बी.एस. एम. एस. (जनरल सर्जन) (पोटाचे विकार व कैंसर तज्ञ), डॉ. आदित्य सोंदणकर एम.बी.बी.एस. डि.एन.बी. (मेडीसीन) हृदय रोग , मधुमेह , थॉयराइड तज्ञ (सल्लागार चिकित्सक), डॉ. मोहसीन अहेमद बि ए एम एस, जनरल फिजीशियन बालरोग तज्ञ, डॉ. हिना सालेहा बी ए एम एस , स्त्री रोगतज्ञ यांचे उपस्थितीत होणार आहे .तपासणी फी 50 रुपये असून सोनोग्राफी व रक्त तपासणी, एक्स रे, औषधी सवलत दरात देण्यात येईल.

शुगर तपासणी मोफत राहील फक्त १५० पेशंटची तपासणी करण्यात येणार असल्याने नाव नोंदणी कामरान खान राहत क्लिनीक मो. 9529075258 वर करण्याचे व शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन राहत क्लीनिक चे संयोजक आसीफ अन्सारी यांनी केले आहे.