लासलगाव येथे वर्षावास प्रारंभ व विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न

34

✒️संदिप सोनवणे(विशेष प्रतिनिधी,येवला)मो:-९६०४१६२७४०

येवला(दि.4जुलै):- लासलगाव येथे भारतीय बौध्द महासभा लासलगाव शहर शाखा, फुले शाहू आंबेडकर बहुउद्देशीय संस्था, यशोधरा व रमाई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे यंदाही बौध्द धम्मातील पवित्र आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या वर्षावास कालावधी मध्ये यशोधरा व रमाई महिला मंडळ यांच्या वतीने राजवाडा बुद्ध विहार व नालंदा बूध्द विहार गणेश नगर लासलगाव येथील बुद्ध विहारात वर्षावास कालावधी मध्ये पवित्र धम्म ग्रंथ भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या धम्मग्रंथाचे वाचन करण्यास समर्पन घेऊन सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख आतीथी लासलगाव उपसरपंच रामनाथ शेजवळ भारतीय बौध्द महासभेचे जेष्ठ बौध्दचार्य दौलत गायकवाड,विजय अहिरे शामराव साळवे यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामुहिक वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले दरवर्षा प्रमाणे फूले शाहू आंबेडकर बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने गूणवंत विद्यार्थी व शिक्षक यांचा गुरु पौर्णिमा निमित्त शाल, सन्मानचिन्ह देऊन येथोचीत सत्कार करण्यात आला डॉ अमोल शेजवळ यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना भविष्यात यशस्वी होण्यासाठी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले, भारतीय बौद्ध महासभेचे विजय अहिरे यांनी वर्षावास कार्यक्रमाचे महत्त्व तसेच काया,वाचा व मनाने होणारे कुशल कर्म अकुशल कर्म या विषयावर धम्मप्रचन दिले.

कार्यक्रमाला साहेबराव केदारे, भास्कर शेजवळ, मनोहर अहिरे गोरखनाथ आंढांगळे अंनत डावरे विक्रम कर्डक,प्रा राजेश शंभरकर, डॉ चारूदत्त अहिरे संतोष गांगुर्डे,राजु शेजवळ, सुमेध भडांगे, नानासाहेब बनसोडे,विलास पानपाटिल विलास खैरनार शाम साळवे, दिपक संसारे अनिलकुमार सोनवणे,एम एस सि बीचे पवार साहेब महिला मंडळाच्या तुळसाताई शेजवळ सूशीला शेजवळ रमन शेजवळ,माया शेजवळ संगीता शेजवळ कांचन साळवे भारती शेजवळ प्रज्ञा शेजवळ छाया पगारे ललीता बागुल, ज्योती केदारे, वैशाली शेजवळ ,मणिषा शेजवळ,छाया जाधव,आशा शेजवळ शिला अहिरे विजया कर्डक कल्पना एलंजे, संध्या निरभवने, ज्योती संसारे,ज्योती शंभरकर पुष्पा गायकवाड सुशिला गायकवाड संगीता शेजवळ आदि धम्मबांधव व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी खीर दान करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय बौध्द महासभा लासलगाव शहर अध्यक्ष प्रकाश संसारे कोषाध्यक्ष राजू शेजवळ, फुले शाहू आंबेडकर बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष मनोज शेजवळ सचीव प्रकाश संसारे सहसचिव अशोक गायकवाड धम्मसेवक विशाल एलंजे आदिंनी प्रयत्न केले