नऊ ऑगस्ट क्रांती दिन

83

स्वातंत्र्याच्या चळवळीला
१९४२ सालातील नऊ ऑगस्टला
स्वातंत्र्यवीरांनी केली सुरुवात
इंग्रजांवर करण्या मात
पेटवायची होती
स्वातंत्र्यवीरांना
स्वातंत्र्याची ज्योत

स्वातंत्र्याची ज्योत पेटविताना
राष्ट्रपिता महात्मा गांधींसह
काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांना
इंग्रजांनी अटक करून
स्वातंत्र्याची चळवळ
टाकायची होती पूर्ण दडपून

राष्ट्रपिता नी नेत्यांच्या
अटकेनंतर
ऑल इंडिया काँग्रेस
कमेटीचे नेतृत्व
स्वातंत्र्यसेनानी
अरुणा असफ आली
यांनी केले

१९४२ च्या ” चले जाव “
आंदोलनात महात्मा गांधीजींनी
राष्ट्रास ” करो या मरो ” चे
आव्हान केले
अरुणा असफ अली नि
अनेक स्वातंत्र्यसेनानींनी
गांधीजींचे आव्हान स्वीकारले
आणि स्वातंत्र्याच्या चळवळीचे
कार्य गतिमान झाले
हा ऐतिहासिक दिवस होता
नऊ ऑगस्ट क्रांती दिन

स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या
स्वातंत्र्यवीरांच्या स्मरणाचा
हा नऊ ऑगस्ट क्रांती दिन
क्रांती दिनी वाहू या
स्वातंत्र्यवीरांना श्रद्धांजली
करू या अर्पण आदरांजली

देशाची एकता नि अखंडता
राखण्याचा करू या संकल्प
स्वातंत्र्यवीरांचे करू या स्मरण
क्रांती दिनी करू या
स्वातंत्र्यवीरांना वंदन ॥

✒️संत कबीर कविराज राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त:-प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,रुक्मिणी नगर,अमरावती.भ्रमणध्वनी :८०८७७४८६०९