ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात-७७२ शाळांना वीजपुरवठाच नाही

142

🔹थकित देयकामुळे ६२० शाळांचे वीज कनेक्शन खंडित – डॉ.गणेश ढवळे

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.13ऑगस्ट):-डिजिटल इंडिया,ई लर्निग आदिचा गवगवा करणा-या शिक्षण विभागाने ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील वीज बिल न भरल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात असुन बीड जिल्ह्यातील एकुण २४८० शाळांपैकी ७७२ शाळांना वीज पुरवठा करण्यात आलेलाच नाही तर ६२० शाळांमधील वीज पुरवठा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा खंडित करुन मीटर काढून नेलेले आहे.त्यामुळे कॉम्प्युटर, स्मार्ट टीव्ही ,डिजिटल बोर्ड, एलईडी आदि उपकरणे व साहित्य धुळखात पडुन असुन एकंदरीतच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्यच अंधारात आहे.

मात्र यासंदर्भात लेखी तक्रार करून डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी आंदोलनाचा ईशारा दिला असता शिक्षणाधिकारी मात्र आम्ही निधीची मागणी केली असुन निधी प्राप्त होताच वीज बिल भरण्यात येईल असे लेखी आश्वासन देत हात झटकून मोकळे झाल्याचे दिसून येत आहे.

एकंदरीतच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाविषयी शिक्षण विभागाला गांभीर्य नसुन गेल्या ४-५ वर्षांपासून वीज कनेक्शन तोडण्यात आलेले असतानाही केवळ निधी संदर्भात मागणी केलेली असुन निधी प्राप्त झाल्यानंतर वीज देयके देण्यात येतील या संवेदनहीन भुमिकेच्या निषेधार्थ व तातडीने शाळांमधील वीज जोडणी करण्यात यावी यासाठी लवकरच शिक्षणाधिकारी यांना कंदिल भेट देऊन जिल्हा परीषद कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे.