जेतवन बुद्ध विहार,मालेवाडा येथे अखिल भारतीय धम्म ज्ञान परीक्षा संपन्न

79

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.13ऑगस्ट):-मानवी मूल्यांचा प्रचार-प्रसार व संस्कार करण्याच्या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंथन समिती,नागपूर द्वारा जेतवन बुद्ध विहार,मालेवाडा यांचे सहकार्यातून ” अखिल भारतीय धम्म ज्ञान परीक्षाचे आयोजन दि.13 ऑगस्ट रविवारला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,मालेवाडा येथे करण्यात आले होते ही परिक्षा डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखीत बुद्ध आणि त्यांचा धम्म” या ग्रंथावर आधारीत वस्तुनिष्ठ स्वरुपाची परिक्षा होती,गावातील एकूण 38 परीक्षार्थींनी यात सहभाग झाले होते.

या परीक्षेकरिता ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म” हा ग्रंथ डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंथन समिती,नागपूर द्वारा परीक्षार्थींना देण्यात आला होता.परीक्षेचे आयोजनात बौध्द पंचकमेटी मालेवाडा, भीमज्योती महिला मंडळ मालेवाडा,प्रबुद्ध विचार मंच मालेवाडा यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी केंद्र प्रभारी म्हणून असित बांबोडे यांनी तर केंद्र व्यवस्थापनात प्रदीप मेश्राम, सनय बांबोडे,दिक्षांत शेंडे, साहील शेंडे,प्रशिक बहादुरे, तेजस शेंडे आदींचे सहकार्य लाभले.परीक्षेच्या यशस्वीतेकरिता जगदीश रामटेके,आशिक रामटेके, प्रतिक शेंडे,योगेश मेश्राम यांनी विशेष प्रयत्न केले.

जि.प. शाळा,मालेवाडा मुख्याध्यापिका मा.तुरारे ताई आणि ग्रामपंचायत मालेवाडाचे सरपंच कालिदास भोयर यांनी सहकार्य केले सदर परीक्षेचा निकाल आणि पारितोषिक 14 ऑक्टो ला देण्यात येणार आहे असे आयोजकांनी सांगितले आहे