कोसंबी खड. येथील त्रिवेणी गंगा मत्स्य पालन सहकारी संस्थेवर भाजपाने फडकविला झेंडा

173

🔸माजी आमदार प्रा.अतुल भाऊ देशकर आणि माजी जि. प.सदस्य शंकर दादा सातपुते यांच्या नेतृत्वात भाजपाच्या सर्व उमेदवारांची अविरोध निवड

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपूरी(दि.1 सप्टेंबर):-वांद्रा,आक्सापुर आणि कोसंबी (खड.)या तीन गावांची संयुक्त त्रिवेणी गंगा मत्स्यपालन सहकारी संस्थेच्या निवडणूकीचा निकाल दि. 31/8/ 2013 रोजी उप सहाय्यक निबंधक सहकारी संस्था ब्रह्मपुरी येथे निवडणूक अधिकारी एन. पी. अवचट यांनी हा निकाल जाहीर केला.यामध्ये त्रिवेणी गंगा मत्स्यपालन सहकारी संस्थेवर भाजपाचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आलेले असून गेल्या पंधरा वर्षापासून काँग्रेसच्या हातात असलेली सत्ता दणदणीत विजय प्राप्त करून भारतीय जनता पार्टीने हस्तगत केली आहे.

या निवडणुकीकरता जिल्ह्याचे पालकमंत्री, वने,सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार; ब्रह्मपुरी विधानसभेचे लोकप्रिय माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर यांचे मार्गदर्शनाखाली तर माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरदादा सातपुते यांचे नेतृत्वात तर विलास वाकुडकर तालुकाध्यक्ष भाजपा कामगार मोर्चा ब्रह्मपुरी तालुका तथा सदस्य संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती ब्रम्हपूरी, भिवाजी पंढरी गेडाम आक्सापूर, विद्वान नैताम कोसंबी, पुरुषोत्तम सोमाजी जराते कोसंबी, रामकृष्ण विठोबाजी मेश्राम वांद्रा, दयाराम मेश्राम वांद्रा यांचे विशेष सहकार्याने ही निवडणूक जिंकण्यात आली आहे.

विजयी उमेदवारांमध्ये अध्यक्ष- चरणदास हरबा मेश्राम वांद्रा, उपाध्यक्ष -लक्ष्मण अडकू भोयर कोसंबी, देवाजी बगाजी मेश्राम सदस्य वांद्रा, पंढरी तुळशीराम मेश्राम सदस्य वांद्रा,विष्णू सुकलजी शेंडे सदस्य आक्सापुर, श्रीमती तुळजा माधव मेश्राम सदस्या आक्सापुर यांनी विजय संपादन केला.

या यशस्वी विजयाबद्दल तालुक्याचे भाजपा तालुकाध्यक्ष प्राचार्य अरुण शेंडे,प्रा.प्रकाश बगमारे प्रदेश सदस्य भाजपा ओबीसी मोर्चा, डॉ.गोकुल बालपांडे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा चंद्रपूर, भा.ज.यु.मो. तालुकाध्यक्ष प्रा. रामलाल महादेव दोनाडकर, सौ.वंदना शेंडे उपाध्यक्ष भाजपा महिला आघाडी चंद्रपूर, तनय देशकर जिल्हा सचिव भाजयुमो चंद्रपूर,माणिक पा.थेरकर जिल्हा सचिव भाजपा चंद्रपूर,प्रेमलाल धोटे अध्यक्ष ओबीसी मोर्चा,द्यानेश्वर पाटील दिवटे महामंत्री भाजपा ब्रम्हपूरी तालुका,संजय गांधी निराधार समितीचे सदस्य विलास वाकुडकर, प्रा.यशवंत आंबोरकर महामंत्री भाजयुमो ब्रह्मपुरी तालुका,अविनाश मस्के महामंत्री भाजयुमो ब्रह्मपुरी,धीरज पाल संयोजक सोशल मीडिया सेल ब्रम्हपूरी विधानसभा, एकनाथ मेश्राम वांद्रा,विश्वनाथ तुळशीराम गेडाम, श्यामरावजी मेश्राम इ.नी अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.