मी शाळेसाठी? की शाळा माझ्यासाठी?

143

शिक्षणाचे मुख्य सुञ सहकार्य आहे, असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीता या ग्रंथात म्हणतात. शिक्षण ही एकमेकांच्या सहकार्याने चालणारी प्रक्रिया आहे. शाळेत मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सहकार्यानेच कुठल्याही शाळेचे कामकाज चालते. जसे आपले कुटुंब असते तशीच शाळा आहे. कोणतेही काम जर सहकार्याने केले तर फार कठिण आहे, असे वाटत नाही.

परंतू शाळेत कामाच्याबाबत कमीजास्त होत असते, परंतू ” मेरी मुर्गी एकही टांग ” असे चालत नाही. आपण आपला काही विशेष पगडा दाखविण्यासाठी जर शाळेत काम करित असाल तर ती आपली चूक आहे. आपण थोडे जरी काम केले तर माणसाला ‘मी’पणाची भावना चाटून जाते. मी काहीतरी करीत आहो. दुसर्याकडे बोट दाखवून तो काहीच करीत नाही, अशी आपली भावना होते.

मनुष्यामध्ये हा मानवी स्वभाव आहे. काही लोक आपण काहीतरी करित आहो. हे नेहमी दाखविण्यासाठी कोणतीही गोष्ट इतरांना सांगत नाही कारण त्याला जर समजले तर माझे महत्त्व काय राहिले? असा संकुचित भाव आपल्या मनात येतो. शुद्र अहंकाराच्या पोटी दुसर्याचे महत्त्व वाढू नये असे आपल्याला वाटते.

मलाच कोणतेही काम जमते, मग दुसर्याने जर एखादी चांगले काम केले तर त्याला पटत नाही. शाळेत सर्वच कर्मचारी आपापली कामे करतात यात वाद नाही. फक्त प्रमाण कमीअधिक असू शकते. आपण आपले नाही तर आमच्या शाळेचे नाव झाले पाहिजे असा विचार केला पाहिजे. मी देखील एक शाळेचा घटक आहो. शाळेचे नाव झाले म्हणजे त्यात मीही आलोच.

शिक्षण व त्यासोबतच येणारे सर्व सहशालेय उपक्रम असो किंवा कोणतेही काम असो सहकार्याशिवाय शक्य नाही एकट्याने होत नसते, सर्वांचा हातभार आवश्यक आहे. शाळा माझ्यासाठीच आहे व मीही शाळेसाठीच आहो. मी एकटा नाही. सहकार्याने फार मोठमोठी कामे होत असतात. ज्याला जे जे चांगले जमते ते ते करावे परंतू एकट्याने सर्व कामे केल्याने होत नाही. सर्वांनाच आळीपाळीने ते काम द्यावे. म्हणजे प्रत्येकाला संधी मिळेल. एखाद्या एकाच एक विद्यार्थ्याला सर्व स्पर्धेची बक्षिसे जर मिळाली तर त्याचे महत्त्व राहत नाही. तसेच कुठल्याही कामात जर एकच व्यक्ती पुढे असेल तर त्याचे महत्त्व इतरांना वाटत नाही. उद्या असे होते की, शाळेतच नव्हे तर एखाद्या चांगल्या ठिकाणी जर संधी मिळत असेल तर ती त्यांनी घ्यावी.निदान घेणे शक्य नसेल तर आपल्या इतर कोणत्याही बंधुभगिनींना द्यावी.पण हे काम न करता कुणी जर शाळेतच पुढे राहण्याचा खोटा आशावाद जर मनी बाळगत असेल तर हा आपला भ्रम आहे.

कर्तृत्ववान माणसासाठी सारे जग पडले आहे. तो कुठेही जावून भरारी घेवू शकतो. पण लोकांची धारणा अशी आहे की, चांगली काम करणारी माणसेही त्यांना पटत नाही. चोपडी बोलणारी माणसे सर्वांनाच आवडतात केवळ तोंडापुरती स्तुती करणारी पण आपल्या चांगल्या कामाची किंमत कुठेतरी होणारच! मग कुणी चांगलं म्हटलचं पाहिजे हे काम करणार्याला काही जरूरीचे नाही. कृपया शाळा हे प्रत्येक कर्मचार्यांच्या कामाचे प्रतिबिंब आहे.एवढेच!

✒️राजेंद्र मोहितकर(प्रसिद्धीप्रमुख महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद चंद्रपूर जिल्हा)मो:-9422909525