5 नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय बौद्ध धम्मांतर्गत व सर्वधर्मांतरितांचा वधू-वर परिचय मेळावा

140

✒️नागपूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

नागपूर(दि.1सप्टेंबर):- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेच्या स्थापनेसाठी आंतरजातीय व आंतरधर्मिय विवाह हा महत्वाचा कार्यक्रम सांगितला. त्या कार्यक्रमाची अंमलबजावणी म्हणून बौद्ध धम्मांतर्गत व सर्व धर्मांतरित वधू-वरांचा विवाह होणे गरजेचे आहे. प्रबुद्ध युवा परिवर्तनवादी विचार मंच औरंगाबाद यांच्या विद्यमाने 7 वा राज्यस्तरीय बौद्ध धम्मांतर्गत व सर्व धर्मांतरीतांचा वधू-वर परिचय मेळावा रविवार दि. 5 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 12 ते 4 वाजे पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह, उरुवेला कॉलनी, वर्धा रोड, नागपूर येथील सभागृहात होणार आहे. इच्छूक वधू-वरांनी आपले परिचय पत्र दि. 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत भरून पाठवावे.

या मेळाव्यास कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. अॅड. रमेश राठोड (अध्यक्ष सार्वजनिक दिक्षा समिती व महाराष्ट्र अंधश्रद्ध निर्मूलन समिती नागपूर), कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक प्रा. कीर्तिलता पेटकर (गर्ल्स ज्युनियर कॉलेज औरंगाबाद), विशेष अतिथी जयंता इंगळे (अध्यक्ष, बानाई नागपूर), कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. यशवंत तिरपुडे (जेष्ठ आंबेडकर विचारवंत नागपूर), प्रा. रंजना सुरजूसे (सामाजिक कार्यकर्त्या व विचारवंत नागपूर), स. सो. खंडाळकर (जेष्ठ पत्रकार व विचारवंत औरंगाबाद) आदी विविध समाजातील मान्यवर उपस्थित राहून आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह करु इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींना मार्गदर्शन करणार आहे. परिचय मेळाव्यासाठी मुख्य आयोजक रामभाऊ पेटकर यांचेशी मो. क्र. 9420809498, 9511200079 वर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.