बेमुदत आमरण उपोषण उधळून लावण्यासाठी अमानुष लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस व प्रशासनाचा जाहीर निषेध. चौकशी करून कारवाई करावी :- सौ. वर्षा मगर

164

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)

परळी वैजनाथ(दि.2सप्टेंबर):-अंतरावाली तालुका अंबड जिल्हा जालना या ठिकाणी मनोज जरांगे पाटील या मावळ्यांनी मराठा आरक्षणासाठी दिनांक 29 ॴॅगस्ट पासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले. व जाहीर केले की आता या ठिकाणा वरून मराठा आरक्षणाची विजयी यात्रा निघेल नाही तर माझी अंतयात्रा. या निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रातुन मराठा समाज भावनिक होऊन उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातुन लोक आंदोलन स्थळी दाखल होऊ लागले.

त्यामुळे हे आमरण उपोषण उधळून लावण्यासाठी चिरडून टाकण्यासाठी पोलीस व प्रशासनाने प्रचंड मोठा फौज फाटा घेऊन आंदोलकांवर महिला लहान मुले वयस्कर माणसे तरुण युवक यांच्यावर आश्रृधुराच्या नळकांड्या फोडत अमानुष लाठीचार्ज केला. पोलीस व प्रशासन यांच्या या कृत्याचा. आईसाहेब जिजाबाई सेवा संस्था व जय महाराष्ट्र महिला संघटनेच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करत.दोषींवर चौकशी करून कडक कारवाई करावी अशी मागणी जय महाराष्ट्र महिला संघटनेच्या अध्यक्षा व कांतीकारी साथीच्या मुख्यसंपादक सौ वर्षा मगर यांनी केली.