रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद

14

औरंगाबाद(पुरोगामी संदेश नेटवर्क)

औरंगाबाद(26जुलै)-कोरोना या राष्ट्रीय आपत्तीच्या पार्श्वभूमीवर गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध व्हावे या उद्देशाने ‘ऋतू लोककल्याण प्रतिष्ठान आणि लोकमान्य ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने औरंगाबाद येथे शनिवार दि:-25 जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला. .
या शिबिरात युवकांनी रक्तदान केले.या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते राजकुमार कांबळे,ऋतू लोककल्याण प्रतिष्ठानच्या अध्यक्षा वर्षा कुरुडे व उपाध्यक्षा पुजा वानखडे तसेच सपना वानखेडे , शीतल मोरे,यश देशमुख, संतोष पवार तसेच संस्थेचे सहकारी सहभागी झाले होते.
कोरोना महामारी संकट काळात आयोजित या रक्तदान शिबीराचे स्थानिक पातळीवर कौतुक होत असून या सारख्या संस्थानी राष्ट्रीय पातळीवर असलेल्या संकट काळात पुढे येणे आवश्यक असल्याचे बोलल्या जात आहे.