आठवले समाजकार्य महाविद्यालयाचा स्थापना संपन्न

148

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.5सप्टेंबर):-महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये तिसावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.आठवले समाजकार्य महाविद्यालयाची स्थापना दिनांक 3 जून 1992 रोजी डॉ. चंदनसिंग रोटेले यांनी ग्रामीण भागात, तालुकास्तरावर समाजकार्य महाविद्यालयाची स्थापना केली. आज तीस वर्ष पूर्ण होत आहे. त्या प्रित्यर्थ महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी सकाळी १० वाजेपासून ते दुपारी ०१ वाजेपर्यंत विविध कार्यक्रम पार पाडले. त्यात गीत गायन, डॉन्स, वक्तृत्व इत्यादी स्पर्धा उत्साहात साजऱ्या करण्यात आल्या, त्यानंतर या संस्थेचे अध्यक्ष डॉ. केदार सिंग रोटेले यांच्या अध्यक्षतेत तर किरणताई रोटेले (माजी सिनेट सदस्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर), तसेच डॉ शुभांगी लुंगे (प्राचार्या आ स महा चिमुर), डॉ. सुनील झाडे, डॉ. गजानन बनसोड यांचे प्रमुख उपस्थितीत स्थापना दिवस संपन्न झाला.

यावेळी नवनियुक्त तरुण अध्यक्ष डॉ. केदार सिंग रोटेले यांचा शिक्षक – शिक्षकेतर कर्मचा त्यांतर्फे शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. त्याचबरोबर किरणताई रोटेले यांचा सुद्धा शाल श्रीफळाद्वारे सत्कार करण्यात आला.

मा प्राचार्य डॉ शुभांगी लुंगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले,

महाविद्यालयाच्या विकासाकरिता आवश्यक बाबीवर प्रकाश टाकण्यात आला व शेवटी डॉ. चंदनसिंग रोटेले यांना मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता केली. या कार्यक्रमाचे संचालन प्रा. हेमंत वरघने यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. सुरेश मिळविले यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.