शिक्षक गौरव पुरस्कार कार्यक्रम संपन्न

114

✒️नागपूर(पुरोगामी न्युज नेटवर्क)

नागपूर(दि.5सप्टेंबर):-साधन केंद्र रामा येथे केंद्रस्तरीय शिक्षक गौरव पुरस्काराचे आयोजन शिक्षकदिनी करण्यात आले होते .या कार्यक्रमाचे आयोजक केंद्रप्रमुख मा. वनमाला डोकरीमारी मॅडम होत्या .तर कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती सन्माननीय सुरेश खंगार सर हे होते.

कार्यक्रमाला केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते .या कार्यक्रमाला संबोधित करताना केंद्रप्रमुख वनमाला डोकरीमारे मॅडम म्हणाल्या की,’ शिक्षक हा देशाचा खरा कणा आहे. शिक्षकाच्या कार्यातूनच नवी पिढी घडत असते .क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले व महात्मा जोतीराव फुले यांच्या कार्यकर्तृत्वाने आज आपण येथे एकत्र आलेलो आहोत. त्यांच्या त्याग आणि समर्पण भावना यामधून देशामध्ये शिक्षणाची एक नवी पहाट उभी झाली होती .त्यांचे फळे आज आपल्याला चाखायला मिळतात. तसेच डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्यावर सुद्धा त्यांनी प्रकाश टाकला.

सत्कार कार्यक्रमाला संबोधित करत असताना सन्मानीय तिमांडे सर आपल्या भाषणात म्हणाले की ,’खंगार सर हे अत्यंत कृतिशील असे शिक्षक होते. त्यांचे व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावीपणे होते. विद्यार्थी ,पालक आणि शिक्षक यांचा समन्वय ठेवायचे. उच्च प्राथमिक शाळा सोनेगाव बोरी येथे क्रियाशील काम केलेले आहे.

त्याचप्रमाणे सत्कार संबोधित करत असताना मा. सुरेश खंगार सर म्हणाले की ,रामा केंद्र हे अत्यंत कृतिशील असे केंद्र आहे. या केंद्रातील शिक्षक अत्यंत प्रेमळ आणि सहकारी वृत्तीचे आहेत. त्यामुळे बाहेर केंद्रात मी जरी गेलो तरी या केंद्राची आठवण मला सदैव होत राहते .उच्च प्राथमिक शाळा सोनेगाव बोरी त्याचप्रमाणे केंद्रातील सर्व शिक्षकाचे त्यांनी याप्रसंगी आभार मानले.

या कार्यक्रमांमध्ये केंद्रप्रमुख वनमाला डोकरीमारे यांनी केंद्रातील सर्व शिक्षकांना शिक्षक गौरव पुरस्कार प्रदान केला. त्यामध्ये मेडल पुष्पगुच्छ, आणि संदीप गायकवाड लिखित मंतरलेले दिवस हा कथासंग्रह देण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सन्माननीय दवंडे सर यांनी केले .कार्यक्रमाचे संचालन मा.हिरामणजी तेलंग सर यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संदीप गायकवाड यांनी मानले.शिक्षक दिन व शिक्षक गौरव पुरस्काराच्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी केंद्रातील सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.