मोफत रेशन देण्यामध्ये ”टाळाटाळ”केल्यास होणार कठोर कारवाई

38

🔺थेट ‘या’ फोन नंबरवर करा फोन

✒️अतुल उनवणे(न्युज ब्युरो चीफ,नवी दिल्ली)मो:-9881292081

नवी दिल्ली(दि.26जुलै):-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या निर्णयाने बुधवारी गरीब कल्याण अन्न योजनेच्या (पीएमजीकेएवाय) विस्तारास मान्यता दिली आहे. स्वतः अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ट्विट करून ही माहिती दिली. केंद्र सरकारने नोव्हेंबर२०२० पर्यंत पीएमजीकेएवाय अंतर्गत ८१ कोटीहून अधिक लोकांना मोफत धान्य देण्याची घोषणा केली होती. तसेच या योजनेत ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाहीत त्यांनाही धान्य दिले जात आहे. ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही, त्यांच्याकडे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड असणे आवश्यक आहे. या योजनेंतर्गत गुलाबी, पिवळ्या आणि खाकी शिधापत्रिकाधारकांना प्रति सदस्य ५ किलो गहू किंवा तांदूळ आणि प्रत्येक कुटुंबासाठी एक किलो डाळी मोफत देण्यात येईल.
मोफत रेशन न दिल्यास होणार कडक कारवाई:-अशा परिस्थितीत कोणत्याही कार्डधारकांना मोफत धान्य मिळण्यास अडचण येत असल्यास ते संबंधित जिल्हा अन्न व पुरवठा नियंत्रक कार्यालयात किंवा राज्य ग्राहक सहाय्य केंद्रावर त्याबद्दल तक्रार करू शकतात. यासाठी सरकारने १८००१८०-२०८७, १८००-२१२-५५१२ आणि १९६७ टोल फ्री क्रमांक जारी केले आहेत. या नंबरवर ग्राहक त्यांची तक्रार नोंदवू शकतात. अनेक राज्य सरकारांनी स्वतंत्रपणे देखील हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत.