परळी तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

122

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)

परळी(दि.7सप्टेंबर):- तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्त्यांनी आज दिनांक ०६ सप्टेंबर रोजी माजी खा. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वंचित बहुजन युवा आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला. बीड जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे व बीड जिल्हा युवा अध्यक्ष बाबुराव मस्के, बीड जिल्हा युवा महासचिव बिभीषण चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रवेश सोहळा संपन्न झाला.

आज जिजामाता उद्यानात युवा तालुका अध्यक्ष राजेश सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या जाहीर प्रवेश कार्यक्रम प्रसंगी वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष गौतम साळवे यांच्या उपस्थितीत तडोळी येथील सचिन सातभाई, शरद गायकवाड,( ग्रामपंचायत सदस्य) संतोष तुपसमुंद्रे( ग्रामपंचायत सदस्य) रामेश्वर शिंदे, समाधान तुपसमुंद्रे, सुदाम चाटे, सुदर्शन सातभाई, प्रदीप शिंदे, सागर शिरसाट, विनोद पाचंगे, गोविंद शिरसाठ, नारायण कांदे, गणपत गायकवाड तर बोरखेड मधील मीनानाथ कचरे, बाळासाहेब परसे, गोरख परसे यांनी आदरणीय वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व मान्य करीत वंचित बहुजन युवा आघाडीत जाहीर प्रवेश केला.

या कार्यक्रमाला भीमराव कसबे, गजानन कानडे ,विनोद रोडे, राहुल बचाटे, वैजनाथ तिरमले, आदर्श जंगले, बाळासाहेब धुमाळ, भारत निसर्धन, आदी कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंचित बहुजन युवा आघाडी शहराध्यक्ष प्रेम जगतकर यांनी तर आभार प्रदर्शन वंचित बहुजन युवा आघाडी तालुका महासचिव ज्ञानेश्वर गीते यांनी केले.