✒️नागपुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नागपूर(दि.27जुलै):-राज्याची उपराजधानी नागपूर दुहेरी हत्याकांडानं हादरली. अनैतिक संबंधांतून पतीने आपली पत्नी व तिच्या प्रियकराची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. ही घटना अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कल्याणेश्वर नगर परिसरात घडली. पोलिसांनी मारेकरी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. किरण कुवरलाल बरमैया (वय २९) आणि शिवा अशी मृतांची नावे आहेत. कुंवरलाल भारत बरमैया (वय ४०) असे अटकेतील मारेकरी पतीचे नाव आहे. पोलिसांनी हत्येसाठी वापरलेली कुऱ्हाड जप्त केली आहे.

Breaking News, क्राईम खबर , नागपूर, महाराष्ट्र, विदर्भ

©️ALL RIGHT RESERVED