पुसेगाव पोलिसांचा कारवाईचा धडाका 20 गुन्हेगारांवर तडीपरीची कारवाई

251

✒️सातारा-खटाव,प्रतिनिधी(नितीन राजे)मो:-9822800812

सातारा(दि.23सप्टेंबर):- जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेगाव पोलीस ठाणे हद्दीत गणेशोत्सव व ईद ए मीलाद अनुशंगाने हद्दीतून 20 सराईत गुन्हेगारांना तडीपार केले असल्याची माहिती , सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांनी दिली

पुसेगाव येथील दाखल गुन्ह्यातील 32 इसमांचे चांगल्या वर्तणुकीचा बाँड घेण्यात आला आहे,गणेशोत्सवात हुल्लडबाजी करणारे 57 युवकांवर महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये केसेस करून चांगल्या वर्तणुकीसाठी सक्त ताकीद देण्यात आली आहे,वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 101 वाहन चालकावर mv act प्रमाणे कारवाई करून 61700 रुपये दंड आकारण्यात आला आहे ,18 डॉल्बी धारकांना crpc 149 प्रमाणे नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

एक गाव एक गणपती 20 गावात असून 1 अधिकारी 20 पोलीस, 25 होमगार्ड दिवसरात्र सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत.एक गाव एक अंमलदार अशी सुरक्षा योजना राबवली आहे एकूण गावे 39 गावात एकूण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ 115 स्थापित झाली असून सर्वांना शांततेत उत्सव साजरा करणेबाबत 115 गणेश मंडळात तसेच शांतता समितीच्या 24 गावात मीटिंग घेवून शांतता अबाधित ठेवण्याच्या कडक सूचना पुसेगाव पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांचेकडून देण्यात आल्या आहेत.