केंद्र शासनाच्या पथकाची गंगाखेड तालुक्यातील मालेवाडी गावात भेट

194

🔸प्रधानमंत्री किसान सन्मान निधीतून मालेवाडी शेतकऱ्याचे भाग्य उजळणार

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.25सप्टेंबर):-प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत शासनाकडून देत असलेल्या लाभासाठी लाभार्थ्यांची नोंदणी वाढविण्यास वाव असल्याने भारत सरकार आणि राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नांनी योजनेच्या लाभार्थीचे प्रमाण संपुष्टता साध्य करण्यासाठी केंद्र शासनाने “प्रूफ ऑफ कन्सेप्ट “ही संकल्पना राबविण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्यातून परभणी जिल्ह्यातील मालेवाडी गाव हे केंद्र शासनाच्या वतीने निवडले असून poc पार पाडण्यासाठी मालेवाडी गावातील शेतकरी सर्वेक्षणाचा भाग म्हणून मालेवाडी येथे भारत सरकारच्या वतीने सर्वेक्षण भेट घेण्यात आली.

यावेळी भारत सरकार मंत्रालयातील सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी जॉईन डायरेक्टर मा. श्री ज्ञानेंद्र सिंग जी, मानव संसाधन विकास मंत्रालय सहसचिव मा.श्री अर्णब ढाकी जी,भारत सरकार संसाधन व्यक्ती मा.श्री विनय बिरमन जी, उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर,तहसीलदार शेलार सर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मा कोलेसर,तालुका कृषी अधिकारी मा.बनसोडे सर, ग्रामसेवक मा.माधव अदोडे, उपसरपंच उमेश चंदेल.माजी प.स.सदस्य यशवंत भालेराव, ज्येष्ठ नागरिक उत्तमराव कुकडे इत्यादींची उपस्थिती होती.

भारत सरकारच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील निवड केलेली गावे अमरावती जिल्ह्यातील कोटनाद्रा, औरंगाबाद जिल्ह्यातील रासेगाव व परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातून मालेवाडी गावाची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत निवड झाल्यामुळे मालेवाडी येथील शेतकरी यांना संपुष्टता साध्य भविष्यातील नियोजन असल्यामुळे मालेवाडी शिवारातील शेतकऱ्यांना या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार असल्याचे पथकाच्या वतीने सांगण्यात आले.

पथकाच्या भेटीदरम्यान प्रधानमंत्री किसान सन्मान निधी करिता संभाव्य शेतकऱ्यांची यादी करण्यात येणार असल्याने poc पार पडण्यासाठी तलाठी,ग्रामसेवक व कृषी अधिकारी यांच्या मार्फत शेतकऱ्यांनी सर्वेक्षणात भाग घ्यावा असेही यावेळी पथकामार्फत सांगण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी बांधवांची उपस्थिती होती. यावेळी केंद्र शासन व राज्य शासनातील अधिकारी यांचा गंगाखेड तहसील अंतर्गत सत्कारही करण्यात आला.