शेतात पाणी साचल्यामुळे झालेल्या शेत पिकांचे नुकसानीची नुकसान भरपाई द्या – प्रा अमृत नखाते शिवसेना उपजिल्हाप्रमुख

146

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.25सप्टेंबर):-ब्रम्हपुरी तालुक्यातील सुरबोडी-सोंदरी-पिंपळगांव (भो.)- अहेरनवरगांव या रस्त्याचे डांबरीकरण व मजबूतीकरण करतांना पिंपळगांव हराडे चौक (बायपास)जवळ सीडी वर्क सदोष बांधकामातून जून-जुलै २०२३ मध्ये करण्यात आले. परंतु बांधकाम सदोष असल्यामुळे गट क्र. ७४२, ७४१ या शेतामधील पावसाचे साचलेल्या पाण्याचा प्रवाह खंडीत झाला आहे. परिणामी, शेतामध्ये पाणी साचून राहत असल्यामुळे शेतामधील पेरणी खोळंबली तसेच काही जवळील शेतामध्ये धान पिक लावले असता साचलेल्या पाण्यामुळे धान पिक पूर्णतः नष्ट झाले. त्यापूर्वी लावलेले भेंडी, वांगे व इतर पिकांचेही मोठया प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना पुर्नलागवड करावी लागली.

सुरबोडी-सोंदरी-पिंपळगांव- अहेरनवरगांव रस्त्याचे डांबरीकरण व मजबूतीकरण या रस्त्यावर पिंपळगांव हराडे चौक (बायपास) जवळ सदोष सीडी वर्क झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्यामुळे शेतपिकाचे प्रचंड नुकसान झाले. त्याबद्दल शेतकऱ्यांची विवंचना लक्षात घेऊन नुकसानीचे सर्वेक्षण करून पिडीत शेतकऱ्यांना संबंधीत रस्ता ठेकेदाराकडून नुकसान भरपाई देण्यासाठी योग्य कारवाई करण्यात यावी.

अशा मागणीचे निवेदन ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रा. अमृत नखाते यांनी उपविभागीय अधिकारी ब्रह्मपुरी ( राजस्व ), तहसीलदार ब्रह्मपुरी, उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय ब्रह्मपुरी यांना दिले.यावेळी सेवानंद धर्माजी मेश्राम, नानाजी विठोबा नखाते, गुलाब पंढरी नखाते, गोविंदा रामजी नखाते पिंपळगांव (भो) आदी शेतकरी उपस्थित होते.