अमरावती – पांढूर्णा महामार्गावरील टोलनाका रद्द न झाल्यास आंदोलनाचा ईशारा !

189

🔹नींभी येथील टोल नाक्याची भूमिका शासनाने स्पष्ट करावी !

🔸५० किलोमीटरच्या रस्त्यासाठी २ टोल नाक्यांचा भुर्दंड कशासाठी ?

✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मोर्शी(दि.12सप्टेंबर):-नांदगावपेठ मोर्शी वरूड पांढूर्णा राष्ट्रीय महामार्गाचे काम अपूर्ण असतांनाही वरूड मोर्शी अमरावती राष्ट्रीय महामार्गावर निंभी येथे टोल नाका सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने परिसरातील नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या महामार्गावरून मोर्शी वरूड तालुक्यातील लोक मोठ्या संख्येने अमरावती ये-जा करीत असतांना नांदगाव पेठ येथील टोल नाक्यावर ८ किलोमिटर करीता शेकडो रुपये टोल वसुल करून मोर्शी वरूड तालुक्यातील नागरिकांना भुर्दंड सोसावा लागत असतांना आता पुन्हा नींभी येथे टोल नाका सुरू करून वाहन धारकांची लूट होणार असल्यामुळे निंभी येथील टोल नाका रद्द न केल्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष अंकुश घारड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,महारष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने निंभी येथील टोल नाका सुरू करून टोल वसुली करण्याचा निर्णय घेतला आहे.मात्र नियमाप्रमाणे ७० किलोमीटरपर्यंत रस्ता व्यवस्थित असेल तरच टोल आकारता येतो.या महामार्गाचे काम पूर्ण झाले नसतांनाही जाणीवपूर्वक टोल आकारला जाणार असेल तर त्याला पूर्णपणे विरोध असून नांदगावपेठ मोर्शी वरूड पांढुर्णा पर्यंतचे काम हाती घेऊन अनेक वर्ष झाले.

आतापर्यंत विविध कारणांनी महामार्गाचे काम अर्धवट आहे.त्यामुळे नांदगावपेठ मोर्शी वरूड पांढुर्णा पर्यंत ये-जा करतांना वाहनचालकांना मोठा त्रास होत आहे. वनखात्याने परवानगी देऊन सुद्धा काम लवकर पूर्ण केले जात नाही. त्यामुळे वाहन चालकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आधी अपूर्ण रस्त्याचे व अपूर्ण पुलांचे काम पूर्ण करावे.अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक शहर अध्यक्ष अंकुश घारड, राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांच्या तर्फे करण्यात आली आहे.

{ } अमरावती पांढूर्णा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण झाले नसतांनाही जाणीवपूर्वक टोल आकारला जाणार असेल तर त्याला पूर्णपणे विरोध असून निंभी येथील टोल नाका रद्द झाला पाहिजे,ही आमची भूमिका असून निंभी येथील टोल नाक्या विरोधात लवकरच आमरण उपोषण सुरू करून त्याबाबत पुढील निर्णय घेणार आहे. अंकुश घारड राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष मोर्शी.

{ } निंभी येथे टोलनाका सुरू करतांना परिसरातील नागरिकांना विश्वासात घेणे गरजेचे होते.मात्र ऐनवेळी टोल नाक्याचे काम सुरू करून टोल आकारला जाणार असल्याची माहिती मिळत असल्याने मोर्शी वरूड तालुक्यातील नागरिकांना ६० किलोमिटरसाठी २ टोल नाक्याचा भुर्दंड बसणार असून नागरिकांची आर्थिक लूट होणार असल्यामुळे नागरीकांमध्ये असंतोष निर्माण होत आहे.याची दखल घेऊन महामार्ग प्राधिकरणाने टोल नाका रद्द करावा अशी आमची मागणी आहे.
रुपेश वाळके उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोर्शी तालुका.