औंधची यमाई नवरात्र उत्सवास घटस्थापनेने प्रारंभ

153

✒️सातारा-खटाव प्रतिनिधी(नितीन राजे)मो:-9822800812

सातारा(दि.15ऑक्टोबर):- जिल्ह्यातील खटाव तालुक्यातीलऔंध येथील यमाई देवीच्या मंदिरात नवरात्राची सुरुवात घटस्थापनेने झाली.श्री यमाई देवीचे मंदिर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहेत. परंतु औंध येथील मंदिर मूळपीठ आहे .हे मंदिरनिसर्गरम्य ठिकाणी वसलेले आहे डोंगराच्या पायथ्यापासून मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्या तसेच रस्ता उपलब्ध आहे. पायरी मार्गाने डोंगर चढताना सुरवातीस देवीच्या पादुकांचे दर्शन होते .

आणि पुढे अंतरावर दोन्ही बाजूस संगमरवर यामध्ये कोरलेले हत्ती ,वाघ, सिंह द्वारपाल यांचे शिल्पे पाहण्यास मिळतात. तसेच डोंगरात असलेले श्री गणेश मंदिराचे दर्शन देखील होते. मंदिराजवळ पोहोचण्याआधी मध्यभागी पठारावर उजव्या बाजूस प्रसिद्ध भवानी वस्तू संग्रहालय आहे.हे संग्रहालय श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी तयार केले असून या मध्ये मध्ये अनेक चित्रकृती ,शिल्पे, पुरातन वस्तू आहेत.

नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये यमाई देवीचे विविध रूपामध्ये पूजा बांधण्यात येते . मानकरी, खांदेकरी करणेकरी ,वादक,शिंग वादक , इनामदार हे सर्व मानकरी असतात.देवीची आरती तीन वेळस होते. सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळ म्हणून नामांकित औंध हे ठिकाण आहे. व कलाप्रेमी,इतिहासप्रेमी,भक्त व पर्यटन प्रेमी यांनी औंध या ठिकाणास भेट द्यावी असे मत अवधूत गुरव (करणेकरी) यांनी केले.