लोकसभा निवडणुकीत माणदेशचा कौल सरकारविरोधात जाणार?: मुनीवर शिकलगार

268

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100*

 

म्हसवड : संपूर्ण माणदेशी माणसं विद्यमान सरकारच्या धोरणांना व कारभाराला कंटाळली आहेत असेच प्रस्तुत प्रतिनिधीने दौरा केल्यानंतर समजुन आले. विटा, खानापूर, खरसुंडी , आटपाडी, नाझरे, कोळा, सांगोला, दीघंची,म्हसवड, मायणी या खानापूर, आटपाडी, सांगोला, माण व खटाव तालुक्यात थेट सामान्य लोकांकडून संवादातून अनेक गोष्टींवर संवाद साधला व त्यातून हे धक्कादायक विश्लेषण तयार करण्यात आलेले आहे.
मायदेशातील सर्व तालुक्यांमध्ये सध्या पाणीटंचाई व दुष्काळसदृश वातावरण निर्माण झाले आहे.तरीही कोणत्याही लोकप्रतिनिधी व राजकीय नेत्यांनी याकडे लक्ष दिले नाही.सत्ताधारी भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी यांचे भरपूर कार्यकर्ते गावागावात मते मागत फिरत आहेत, परंतु जनसामान्यांच्या प्रश्नाकडे कोणीही प्रामाणिकपणे लक्ष देत नाहीत.जत, कवठेमहांकाळ,मंगळवेढा याभागात पण सरकारविरोधात असंतोष निर्माण झाला आहे.तो जरी उघडपणे व्यक्त करता येत नसेल तर नक्कीच मतपेटीतून त्याचा दणका एनडीएला असेल अशी विपरीत परिस्थिती माणदेशी पट्ट्यात तयार झाली आहे.टेंभू योजनेत खूप मोठा भेदभाव केला जात आहे, गावातील रस्ते,नागरी सुविधा,पीक हमी योजना, महागाई, बेरोजगारी या तर प्रमुख समस्या आहेतच परंतू माण,खटाव, आटपाडी भागात एकही औद्योगिक वसाहत स्थापन केली गेली नाही.रेल्वेचे जाळे या भागात सातत्याने मागणी करूनही पुर्ण होत नाहीत.मिरज- दौंड व कराड – पंढरपूर अशा लोहमार्गाची प्रतिक्षा माणदेशपटृट्यात केली जाते.तसेच सातारा,सांगली व सोलापूर या जिल्ह्यातील कायमच्या दुष्काळी तालुक्यांचा माणदेश जिल्हा ( माण,खटाव, आटपाडी, सांगोला,मंगळवेढा,जत, माळशिरस, कवठेमहांकाळ, खानापूर) हा प्रस्ताव तर चाळीस वर्षे धुळ खात पडला आहे.कारण सरकार विकास निधी देताना जिल्हा केंद्रस्थानी ठेवून देत असल्याने मातब्बर राजकारणी व सधन भागातील नेते निधीची पळवापळवी करीत असतात त्यामुळे दुष्काळी भागातील लोकांवर सतत अन्याय होत असतो.त्यामुळे विकासासाठी माणदेश कित्येक वर्षे तळमळत आहे.सध्या मायदेशात माण- खटावमध्ये भाजपचे जयकुमार गोरे, सांगोल्यात शिंदे सेनेचे शहाजीबापू पाटील, खानापूर- आटपाडी मध्ये शिंदे सेनेचेच दिवंगत अनिल बाबर,जतमध्ये कॉग्रेसचे विक्रम सावंत,मंगळवेढा – पंढरपूरमध्ये भाजपचे समाधान औताडे तर माळशिरसमध्ये भाजपचे राम सातपुते लोकप्रतिनिधी आहेत.तरीही सर्व ठिकाणी कमी जास्त प्रमाणात भाजप विरुद्ध लाट दिसत आहे. माणमधील रासप नेते महादेव जानकर हे परभणीत महायुतीकडून लढत आहेत.तर अकलूज मधील मोहीते पाटील घराणे घरवापशी करून महाआघाडीकडून नशीब आजमावून पाहत आहेत.माणदेशातील मोठा भाग माढा मतदारसंघात समाविष्ट आहे.त्यामुळे या निवडणुकीवरच माणदेश विकासाचे चित्र अवलंबून आहे.पाहूया अजून आठवड्याभरात या निवडणुकीचा कल एकदम स्पष्ट होईल.