गावंडे महाविद्यालयाचा संघ आंतर महाविद्यालयीन लॉन टेनिस स्पर्धेचा उपविजेता ठरला

84

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड₹दि. 5 नोव्हेंबर):-संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत आंतर महाविद्यालयीन लॉन टेनिस स्पर्धा दिनांक 2-4 नोव्हेंबर 2023 ला गो.सी. गावंडे महाविद्यालयाच्या लॉन टेनिस कोर्ट वर संपन्न झाले.

अंतिम सामना डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावती आणि गो. सी. गावंडे महाविद्यालय, उमरखेड यांच्यात झाला. यावेळी डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावती हा संघ विजयी ठरला तर गो. सी. गावंडे महाविद्यालय, उमरखेड चा संघ उपविजेता ठरला.

या सामन्याचे बक्षीस वितरण प्रमुख पाहुणे यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे सचिव डॉ. या. मा. राऊत, प्राचार्य डॉ. माधवराव बी. कदम यांच्या उपस्थितीत झाले.

यावेळी संस्थेचे सचिव डॉ. या.मा. राऊत यांनी खेळाडूंना संबोधित करताना खेळाडूवृत्ती जोपासावी व या खेळात जास्तीत जास्त सहभाग कसा वाढवावा याकरिता सर्वांनी प्रयत्न करावे असे सुचवीले. संस्थेचे सचिव डॉ. या.मा. राऊत, प्राचार्य डॉ. माधवराव कदम, क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. बी. एम. सावरकर, लॉन टेनिस निवड चाचणी सदस्य डॉ. सौरभ घोगरे, डॉ. सागर दंडाळे, प्रा. राहुल कळसे, तालुका क्रीडा संकुल, उमरखेडचे प्रशिक्षक मोहम्मद शकील यांच्या शुभ हस्ते दोन्ही संघांना विजेता व उपविजेता ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.

गावंडे महाविद्यालयाचा लॉन टेनिस संघ उपविजेता राहिल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष, सचिव, प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक तसेच सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. बी.एम. सावरकर यांनी केले.