उमरखेड – नांदेड खाजगी ट्रॅव्हल्स बंद करा..!

272

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ) मो.9823995466

उमरखेड (दि. 19 नोव्हेंबर) उमरखेड नांदेड खाजगी ट्रॅव्हलर्स बंद करा..! अशी मागणी उमरखेड व हदगाव शहर आणि तालुक्यातील प्रवासी करत आहेत.

कारण उमरखेड वरून हदगाव करिता खाजगी ट्रॅव्हल्स मध्ये प्रवासी घेतला जात नाही.
व तसेच हदगाव वरून उमरखेडला प्रवासी घेतला जात नाही..! याची विचारणा केली असता ऑटो वाले आम्हाला वाद घालतात. म्हणून आम्ही उमरखेड – नांदेड ट्रॅव्हल्स मध्ये उमरखेड हदगाव व हदगाव उमरखेड असे प्रवासी खाजगी ट्रॅव्हल्स मध्ये घेत नाही व घेणार नाही असे उद्धट भाषेत बोलून प्रवाशांची दम छाटी करत असतात असे आढळून आले आहे.

यावरून असे लक्षात येते की, उमरखेड ऑटो वाल्यांनी हदगावचे प्रवासी विकत घेतलेले आहेत तसेच हदगाव वाल्यांनी उमरखेड येथून येणारे प्रवासी विकत घेतलेली आहे असे यावरून सिद्ध होत आहे.

आणि खाजगी ट्रॅव्हल्स उमरखेड वरून नांदेड ला जात असताना तीन तासाचा वेळ घेत असते.
या मार्गावरील कुठेही बस थांबून प्रवासी घेतला जातो. त्यामुळे वेळेवर बस नांदेड येथे पोहोचत नाही. आता रस्ता ही खूप चांगल्या प्रकारे तयार झाला असून तरीसुद्धा तीन तास लागतातच.

या खाजगी ट्रॅव्हल्समुळे एसटी महामंडळाला सुद्धा याचा आर्थिक फटका बसताना दिसत आहे.

म्हणून ह्या खाजगी ट्रॅव्हल्स त्वरित बंद करण्यात यावा अशी मागणी उमरखेड व हदगाव तालुक्यातील जनता करीत आहे.