पोलिंग चिट्ठी न मिळाल्याने अनेक मतदार मतदानापासून वंचित (कामचुकार बीएलओवर कारवाई होणार का)

235

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

उमरखेड :- (दि.28 एप्रिल)
हिंगोली लोकसभेसाठी शुक्रवार 26 रोजी घेण्यात आलेल्या मतदानासाठी उमरखेड शहरातील अनेक मतदारांना पोलिंग चिठ्ठी न मिळाल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही.

बी एलओचा निष्काळजीपणा आणि निवडणूक आयोगाचे दुर्लक्ष यामुळे मतदारांना मानसिक त्रास सहन करावा लागला. या प्रकरणी संबंधित बीएलओची चौकशी करून दोषी आढळल्यास निश्चित कारवाई करण्यात येई

हिंगोली लोकसभा मतदार संघातील उमरखेड शहरा सह तालुक्यातील मतदारांनी शुक्रवारी आपला मतदानाचा हक्क बजावला. पण यावेळी अनेक मतदारा पर्यत पोलिंग चिठ्ठी पोहचली नसल्याने त्यांना मतदान करता आले नाही.

बीएलओ वर पोलिंग चिठ्ठी पोहचविण्याची जवाबदारी प्रशासनाने दिली होती. मात्र शहरातील अनेक प्रभागातील बूथ वरील अनेक मतदारांना पोलिंग चिठ्ठी देण्यात न आल्याने या मतदारांना मतदार यादीत नाव पाहण्यासाठी भर उन्हात एका ठिकाण वरून दुसरीकडे धाव घ्यावी लागली.

तर अनेकांची नावे मतदार यादीत आली नसल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले आहे.

असाच प्रकार तालुक्यातील अनेक मतदान केंद्रावर झाल्याचे पहावयास मिळाले या बाबद आमच्या प्रतिनिधी निवडणूक विभागाशी संबंधित असा प्रकार घडला असेल तर निश्चितच बीएलओची चौकशी करून कारवाई करण्यात येईल.

शहरातील काजीपुरा, जाकीर हुसेन वार्ड , जामा मजीत , तातरशा , रहीम नगर प्राथमिक मराठी उर्दू शाळे सह अनेक मतदान केंद्र असल्यामुळे मतदार यादीत नाव पाहण्यासाठी भर उन्हात मतदारांना भटकंती करावी लागली. त्यामुळे मतदाराची तारांबळ उडाली.

10 ते 3 वाजेपर्यंत मतदान केंद्रावर सुद्धा अत्यंत धीम्या गतीने मतदान प्रक्रिया सुरू होती. मतदानासाठी येणारा प्रत्येक मतदार हातामध्ये निवडणूक ओळख पत्र किंवा आधारकार्ड घेऊन मतदान केंद्र शोधण्याचा प्रयत्न करीत होता. पोलिंग चिठ्ठी व मतदान यादीत नावच आले नसल्याने मतदानाचा हक्क बजावत आलं नाही.
प्रशासना कडून हलगर्जीपणा झाल्याचे दिसून आले.निवडणूक आयोगाने दोषी असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्या वर कारवाई करण्याची मागणी.

चौकट :- उमरखेड शहरात बीएलओच्या निष्काळजीपणामुळे मतदारांना मतदान न करता मतदान केंद्रावरन परत जावे लागले.

शहरात पोल चिठ्ठीचे वाटप झाले नाही. त्यामुळे असंख्य मतदारातुन नाराजीचा सूर पसरल्याचे ऐकू येत आहे.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ नागरिक मझर उल्ला खान टेलर उमरखेड