अंबिका नगर परिसरातील आंबेडकरी विचारांच्या अनुयायांनी साजरी केली भीम जयंती

121

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

यवतमाळ (दि. 30 एप्रिल) शहरातील अंबिका नगराच्या परिसरातील लोकांची संख्या कमी असली तरी लोकांनी आपले काम बाजूला सारून वेळ काढून समाजासाठी धावणाऱ्या आमच्या माय माऊल्या प्रत्येकाच्या घरी जाऊन एक एक माणूस जोडून ही जयंती साजरी केली.

कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

तसेच भीम जयंती निमित्त भीम गीते, वेशभूषा स्पर्धा, प्रबोधन व कीर्तनाच्या माध्यमातून फुले शाहू आंबेडकर विचारांचे पाईक आपण कसे होऊ शकतो.
हे समाजाला दाखवून दिले.
अशाप्रकारे कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.

कायदेशीर कार्यक्रमाची परवानगी घेऊन समाजापुढे त्याची रूपरेषा प्रास्तावित केली व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त बाबासाहेब यांना अभिवादन केले.

यावेळी भिमकन्या अध्यक्ष कल्याणी मेश्राम, करुणाताई चौधरी, अभिलाष उरकुडे, प्रतीक वानखेडे, गौरव बन्सोड, दिक्षा वनकर, अमन शिंगाडे, पंकज मून, संस्कार ठमके व समस्त धम्म बांधवांनी एकत्रित येऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.

यावेळी शेकडो भीम अनुयायी यांनी या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.