महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या सुपुत्रांनी केली पोलिसांना शिवीगाळ करून मारहाण

371

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

उमरखेड (दि. 25 एप्रिल)
हिंगोली लोकसभा मतदार संघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांचे सुपुत्र कृष्णा पाटील आष्टीकर यांनी पोलिसांना केली मारहाण व शिवीगाळ केली.

रामकीसन नामदेवराव शिंदे वय 49 वर्ष राहणार गोकुळ नगर उमरखेड यांना एस एस टी पैनगंगा नदी मारलेगाव नाका येथे कृष्णा नागेश पाटील व त्याचे सोबत असलेल्या लोकांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करून हमला केला.

सहाय्यक विनोद मारोतराव काकडे, प्रकाश माधव पवार कृषी सहाय्यक, ग्रामपंचायत शिपाई अशोक बापूराव सूर्य, उपस्थित होते.

“तु माझीच गाडी कसा अडवतोस, तुला वर्दीचा जास्त माज आला का, तु मला ओळखत नाही का मी नागेश पाटील चा मुलगा कृष्णा नागेश पाटील आहे असे बोलु लागला त्यावर कर्मचाऱ्यांनी समजावुन सांगीतले की, आमची वाहने चेक करण्याची डयुटी आहे व ती आम्ही करीत आहे.

एकामागे एक उभे असलेल्या आठ गाडयामधील अंदाजे 20 ते 25 कार्यकर्ते एकदाच नाक्यावर गोळा झाले. त्यातील दोन ते तीन लोकांनी शिवीगाळ केली.

कुष्णा नागेश पाटील याने कर्मचाऱ्यांच्या गळ्यातील आयकार्ड ओढुन धरले व शिवीगाळ केली व ढकलले तसेच सोबत असलेले कर्मचारी हे देखील त्या लोकास वाहन चेक करणेबाबत समजविण्यास गेले असता कुष्णा नागेश पाटील याने सर्वानां शिविगाळ केली.

पो. शी टेंबरे यास बोलला की तुझे नाव काय आहे टेंबरे तुला सस्पेंड करतो, त्याची व्हीडीओ शुटिंग कॅमेरामन राजरत्न नवसागरे हे करीत असता त्याचा कॅमेरा हिसकावुन घेतला व फेकुन दिला व त्याला च्युतमारीच्या कॅमेरा बंद कर चल येथुन नीघ असे बोलला.

पो.शी आडे हे डीव्हायडर येथे उभे होते व घडलेल्या घटनेची अधिकारी यांना सुचना देनेकरीता फोन काढला असता त्यांचा मोबाईल रीअलमी 5प्रो वाहनातील सोबत असलेला बाउंसर याने हिसकावुन घेतला व कुष्णा पाटील याने गाडीत बसुन समोर 15 मीटर अंतरावर जावुन आडे यांचा फोन रागाने रोडवर आपटुन फोडुन टाकला त्यांचे 16,000 चे नुकसान केले. व त्यांचे कुठलेही वाहन चेक करु न देता सर्व कर्मचाऱ्यांना शिविगाळ करुण व जीवे मारण्याची धमकी दीली व शासकीय कामात अडथळा निमार्ण केला. त्याचेवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी अशी तक्रार कृष्णा पाटील आष्टीकर यांच्याविरुद्ध उमरखेड पोलीस स्टेशन मध्ये नोंदविली आहे.

कृष्णा पाटील अष्टीकर व सहकार्यावर कलम 353, 294,427, 504,506,34 भांदवी नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.

विशेष म्हणजे हा प्रकार सुरू असतानाच उमरखेड शहरात जिल्हा अधिकारी तथा जिल्हा पोलीस अधीक्षक निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा बैठक घेत होते .