गंगाखेड येथील दोन दिवशीय तबलीगी इज्तेमाची शांततेत सांगता अल्लाहकडे सर्वांसाठी सुख समृद्धीची प्रार्थना करत दोन दिवसीय इज्तेमाची सांगता

    71

     

    अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी

    गंगाखेड- येथे मुस्लिम बांधवांच्या वतीने 23 आणि 24 नोव्हेंबर रोजी कोद्री रोड ईदगा मैदानावर तबलीगी इज्तेमा आयोजित केला होता या तबलीगी इज्तेमाची आज अगदी शांततेत सुव्यवस्थेत सांगता झाली असून दिनांक 23 नोव्हेंबर पासून सकाळी साडेपाच वाजता नमाज पठण करुन सुरुवात होती.
    राज्यभरात तब्लिगी इज्तेमाला १७ नोव्हेंबरपासून सुरवात होणार आहे. गेल्या वर्षी राज्यात २४ ठिकाणी इज्तेमा झाले होते.
    या वर्षी इज्तेमांची विभागणी करण्यात आली होती .राज्यातील १५४ विविध ठिकाणी इज्तेमा होणार असल्याचे येथील प्रमुखांनी सांगितले होते.
    भारत व दक्षिण आशिया देश यांचे प्रमुख कार्यक्षेत्रात आहे. भारतीय उपमहाव्दीपात इतरांच्या अंधानुकरणातून काही कर्मकांडे मुस्लिम समाजात घुसल्याने अनेक रुठी परंपरेच्या आहारी इथला समाज गेला होता. त्यात सुधारणा करून खरा इस्लाम लोकांना समजावून सांगणे, नमाज पडण्याची पद्धत शिकणे तसेच इतर वाईट सवयींच्या निर्मूलनाकरीताही त्याच अनुषंगाने गंगाखेड या ठिकाणी दोन दिवसाचा तबलीगी इज्तेमा आयोजित करण्यात आला होते त्या इस्तेमा मध्ये दवाखान्याची सोय ,रुजू करण्यासाठी मंडप, स्वच्छालय, पाणी साठण्यासाठी टँकर, जेवणाची सोय व इतर समाजासाठी वेगळी बसण्याचे वैयक्तिक सोय उत्तम पद्धतीने करण्यात आली होती.
    42 एक्कर मध्ये भव्य स्वरूपात मंडप टाकण्यात आला होता.