पुसद तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करा – मनसेची मागणी

117

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ) मो.9823995466

पुसद (दि.24 नोव्हेंबर) तालुक्यात या वर्षीच्या उशिरा आलेल्या संतधार पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान होते दिवाळीत येणारे सोयाबीनचे पीक हातातून गेले व एकरी 3 ते 4 क्विंटल सोयाबीन शेतकऱ्यांच्या हातात आले उत्पन्नात 50 ते 60 टक्के घट झाली त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली राज्यात यवतमाळ जिल्हा हा पहिलेच आत्महत्या ग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि त्यात हे आलेले आस्मानी संकट तरीही या कडे शासन व लोकप्रतिनिधी कडून दुर्लक्ष करण्यात आले आहे असे दिसून येते.

या वर्षीच्या नापीकी मुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे तरी पुसद तालुका हा दुष्काळ ग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन देण्यात आले यावेळी मनसे तालुका अध्यक्ष संदीप लांडे,शहर अध्यक्ष आकाश रहाटे,जिल्हा उपाध्यक्ष रवी सूर्य,शहर उपाध्यक्ष कुणाल डहाळे,प्रसिध्दी प्रमुख अभिषेक वंजारे,भावसींग राठोड,मंगेश जाधव,अविनाश गरड,शरद साखरे,महेश आगलावे आदी जन उपस्थित होते.