बेलगव्हाण येथे दहा दिवशीय धम्म प्रशिक्षण शिबिराचे उध्दघाटन

102

 

बाळासाहेब ढोले, पुसद प्रतिनिधी

पुसद- दि बुध्दिष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा यवतमाळ व तालुका शाखा पुसद यांच्या यांच्या अंतर्गत बेलगव्हाण येथील त्रिरत्न बुध्दविहारात दहा दिवशीय उपासक उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन दि.२४ नोव्हेंबर २०२३ रोजी करण्यात आले.

तालुका शाखा पुसद यांच्यावतीने आतापर्यंत ५३ गावामध्ये दहा दिवशीय उपासक उपासिका धम्मप्रशिक्षण शिबिर घेण्यात आली. तर ५४व्या दहा दिवशीय धम्मप्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तालुकाध्यक्ष माजी सैनिक भारत कांबळे, उद्घाघाटक प्रचार व पर्यटन जिल्हा सचिव बौध्दाचार्य भगवान बरडे, मार्गदर्शक केंद्रीय शिक्षिका आशा तिरपुडे यवतमाळ तर प्रमुख आतिथी शहराध्यक्ष ल.पु.कांबळे,माजी जि.प.सदस्य भोलानाथ कांबळे, प्रल्हाद खडसे,प्रकाश कांबळे,गोविंद खंदारे, गौतम जगताप हे मान्यवर उपस्थित होते.
या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

उपस्थित मान्यवरांनी या दहा दिवशीय धम्म प्रशिक्षण शिबिरास शुभेच्छा पर मार्गदर्शन केले. भारत कांबळे यांनी अध्यक्षीय भाषणात या शिबिरास उपासक-उपासिका यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस पाटील सुशिल काटे यांनी केले तर आभार उत्तम काटे यांनी मानले. या कार्यक्रमाची सांगता सरणतय गाथेने करण्यात आली.