🔸प्रहार दिव्यांग संघटनेची तालुका कार्यकारिणी जाहीर

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी) मो.७७५७०७३२६०

नांदेड(दि.29जुलै):-देशात कोविड-१९ चा हाहाकार माजला असताना दिव्यांच्या जगण्याचा प्रश्न गंभीर झाला असताना नरसी येथील ग्रामसेवक व सरपंच यांनी दिव्यांगाच्या हक्काची निधी वाटप करुन कोविड काळात मदत केली.
६० लाभार्थ्यानां प्रत्येकी ३००० तिनं हजार प्रमाने धनादेश देण्यात आला.
या वेळी उपस्थित मान्यवर भाजपाचे जिल्हा सरचिटणीस मा.श्रावण पाटील भिलवंडे,व सरपंच सौ.ममता गजानन भिलवंडे, गजानन पाटील भिलवंडे, गंगाधर पाटील भिलवंडे, ग्रामसेवक गोरे साहेब, तंटा मुक्ती अध्यक्ष गंगाधर वडगावे, ग्रामपंचायत सदस्य माधव कोरे, पत्रकार सय्यद जाफर, मनोहर तेलंग, दिलीप वाघमारे, अनिल बोधने, देविदास सुर्यवंशी, श्याम गायकवाड व उत्तम नरसीकर, सामाजिक कार्यकर्ते खाकीबा सुर्यवंशी, गंगाधर भेदे,—
याच — कार्यक्रमात प्रहार दिव्यांग संघटनेचे काही पदे नायगांव तालुका अध्यक्ष साईनाथ बोईनवाड यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. श्यामसुंदर गायकवाड यांची प्रहार दिव्यांग संघटनेच्या नायगांव तालुका संपर्क प्रमुख म्हणुन नियुक्ती करण्यात आली.माधव जानोरे यांची नरसी शहर सचिव पदी निवड करण्यात आली.उस्मान चाऊस नायगांव तालुका सहसचिव पदी निवड करण्यात आली.अंकुश देवकर नरसी सर्कल उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.भास्कर जाकोरे नरसी शहर प्रसिद्धी प्रमुख म्हणुन निवड करण्यात आली.निवङी बदल सर्वांचे अभिनंदन करण्यात आले.

कोरोना ब्रेकिंग, नांदेड, महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED