हरिनामाच्या गजरात काकडा आरतीची समाप्ती

204

 

बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी मो. 78751 57855

पुसद-आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी म्हणजे चातूर्मास या चार महिन्याच्या काळामध्ये रोज सकाळी काकडा आरती ,भजन चालू असते .त्यानंतर कार्तिकी पौर्णिमेला काकड्याची समाप्ती होते.
यादरम्यान सकाळी टाळ,मृदुंग ,हरिनामाच्या गजरात दिंडी निघत असते. दिंडी एका महिन्याची, पंधरा दिवसाची किंवा पाच दिवसाची काढतात असाच प्रकारे पुसद तालुक्यातील मांडवा येथे चाळीस ते पन्नास वर्षापासून काकडा आरतीची परंपरा चालू आहे . यावर्षी पंधरा दिवसाची दिंडी काढण्यात आली.

काकडा आरती ,दिंडी ही टाळ,मृदुंग हरिनामाच्या गजरात भक्तीमय वातावरणात श्री.समर्थ नागोजी महाराज यांच्या देवस्थानापासून गावातील मुख्य मार्गाने रोज सकाळी पाच वाजता काढण्यात आली होती . दिंडी येण्याच्या अगोदर गावातील महिला अंगणात सडा-सारवण ,रांगोळी काढून येणाऱ्या दिंडीचे काकड्याचे पूजन करतात आणि नंतर काकडा आरतीचे हरिनामाच्या गजरात चार महिने सुरू असलेल्या बाराअभंगांच्या भेरीची भक्तिमय वातावरणात आज दि. २७नोव्हेंबर २०२३ रोजी काकडा आरतीची समाप्ती करण्यात आली .
कार्तिक एकादशी निमित्त श्री समर्थ नागोजी महाराज यांचा अभिषेक करण्यात आला व फराळाचे वाटप योगेश पुलाते यांच्यावतीने करण्यात आला. तसेच यावेळी तुकाराम चव्हाण व अशोक आडे यांनी भजनी मंडळांचा श्रीफळ ,टॉवेल व टोपी देऊन सत्कार केला.

काकडा समाप्तीनंतर श्री .समर्थ नागोजी महाराज देवस्थान येथे महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री .समर्थ नागोजी महाराज भजनी मंडळ आणि समिती तसेच गावातील समस्त नागरिकांनी अथक परिश्रम घेतले.