दहा दिवशीय उपासक उपासिका धम्मप्रशिक्षण शिबिराचे आयोजन

92

 

 

बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी मो. 78751 57855

पुसद- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा यवतमाळ यांच्या अंतर्गत तालुका शाखा पुसद यांच्यावतीने न्यु पंचशील बुद्धविहार मुखरे चौक पुसद येथे ५५व्या दहा दिवसीय उपासक-उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन ११ डिसेंबर ते २०डिसेंबर पर्यंत करण्यासंदर्भात मिटींगचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी तालुकाध्यक्ष माजी सैनिक भारत कांबळे,माजी जि.प.सदस्य तथा समता सैनिक दल प्रमुख भोलानाथ कांबळे, कोषाध्यक्ष प्रल्हाद खडसे, संस्कार विभाग सचिव विनोद कांबळे हे मान्यवर उपस्थित होते. या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध , क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामूहिक त्रिशरण पंचशील घेऊन मीटिंगची सुरुवात करण्यात आली.

सर्वप्रथम क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
तालुकाध्यक्ष भारत कांबळे यांनी जिल्हाध्यक्ष रविजी भगत यांच्याशी संपर्क साधला असता या दहा दिवशीय धम्म प्रशिक्षण शिबिराकरिता मार्गदर्शक केंद्रीय शिक्षिका म्हणून ज्योतीताई कुंथे नांदेड या उपस्थित राहणार आहेत.
या शिबिराचे उद्घाटक म्हणून जिल्हाध्यक्ष रविजी भगत तर प्रमुख अतिथी जिल्हा प्रचार व पर्यटन सचिव बौध्दाचार्य भगवान बरडे हे उपस्थित राहणार आहेत.तसेच भारतीय बौद्ध महासभेचे शहर व तालुका कार्यकारणीतील तसेच समता सैनिक दलाचे पदाधिकारी मंडळी उपस्थित राहणार आहेत.या मिटिंगचे सुत्रसंचालन गजानन इंगोले यांनी केले तर आभार कमलबाई पाईकराव यांनी मानले.