राज्य वकील परिषदेला तीन लाख रुपयांची पुस्तके भेट

505

 

कोल्हापूर (प्रतिनिधी) : रविवार दि. 3 डिसेंबर रोजी न्यायसंकुल, कसबा बावडा, कोल्हापूर येथे राज्यव्यापी वकिलांची परिषद होणार असून या परिषदेला महाराष्ट्रासह देशभरातून 1500 हून अधिक वकील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन काम करणाऱ्या वकील परिषदेसाठी भगवा फौंडेशन, मुंबई, धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट आणि निर्मिती विचारमंच, कोल्हापूर यांच्यावतीने तीन लाख रुपयांची पुस्तके मोफत भेट देण्यात आली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित मुक्ती कोन पथे? या मराठी भाषणाचा अनमोल ठेवा सम्राट अशोक कालीन धम्मलिपीमध्ये महाराष्ट्रातील धम्मलिपीच्या अभ्यासकांनी लिप्यांतरीत केला आहे. या ग्रंथाचे दोनशे रुपये मूल्य असून जवळपास 1500 हून अधिक प्रती यावेळी राज्य वकील परिषदेला देण्यात आल्या.
यावेळी महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड. विवेक घाटगे, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रशांत देसाई, ॲड. प्रकाश मोरे, ॲड. सरदार किरवेकर, धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा ॲड. करुणा विमल, ॲड. अकबर मकानदार, निर्मिती विचारमंच, कोल्हापूरचे अध्यक्ष अनिल म्हमाने, आंबेडकरी चळवळीचे नेते डॉ. नंदकुमार गोंधळी, संवाद प्रकाशनाच्या प्रकाशिका डॉ. शोभा चाळके, डॉ. स्मिता गिरी, सनी गोंधळी, ॲड. शैलेजा चव्हाण, ॲड. अतुल जाधव, ॲड. सचिन आवळे, ॲड. राजेंद्र पाटील, ॲड. योगेश पाटील, ॲड. दिपक पाटील, ॲड. सुदर्शन पाटील, ॲड. सोहम भोपळे, ॲड. अंशुमन कोरे, ॲड. चिंतामणी कांबळे, ॲड. नवतेज देसाई, ॲड. विराज नलवडे, ॲड. अश्विनी भोसले, ॲड. अमित मोरबाळे, ॲड. श्रीधर कांबळे, ॲड. मनोहर पोवार, ॲड. निशा कांबळे, ॲड. जोतिराव प्राधान, ॲड. सचिन कांबळे, ॲड. दत्ता कवाळे, ॲड. विक्रम सावंत, रतन कांबळे, संदीप सोनुले यांच्यासह कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे वकील व चळवळीतील नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.