संविधान वाचविण्यासाठी सर्वानीं एकत्र येणे काळाची गरज : आनंदराज आंबेडकर

70

 

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारत देश हा संविधानावर चालणारा असून काही लोकांचे संविधान बदलून हिंदू राष्ट्र निर्माण करण्याचे षडयंत्र सध्या सुरू असून संविधान बदलले तर एक नविन गुलामी निर्माण होणार आहे. सर्वसामान्य जनतेचे यामुळे प्रचंड नुकसान होणार आहे. त्यामूळे संविधान वाचविण्यासाठी सर्व समतावादी लोकांनी एकत्र येणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी केले. ते गडमुडशिंगी ता. करवीर येथे दीक्षाभूमी नागपूर ते चैत्यभूमी मुंबई अश्या संविधान बचाव यात्रेच्या स्वागत व सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी आंबेडकरवादी नेते डॉ. नंदकुमार गोंधळी हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात अनिल म्हमाने यांनी संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून केले..
यावेळी संविधान जनजागृती अभियाना अंतर्गत एक लाख संविधान प्रास्ताविका वाटप अभियानाचा शुभारंभ करणेत आला.
यावेळी आनंदराज आंबेडकर यांचा पीपल्स एज्युकेशन सोसायटी शाखा मुडशिंगी, निर्मिती विचारमंच, धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट, निर्मिती फिल्म क्लब व विविध समाज संस्था यांचेवतीने सन्मानचिन्ह व पुस्तके देवून विशेष सत्कार करणेत आला.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात डॉ. गोंधळी यांनी संविधानाचे महत्व अधोरेखीत केले.
यावेळी प्राचार्य बी. बी. पवार, काकासाहेब खंबाळकर, संजीवकुमार बावधनकर, अनिल म्हमाने, आशिष गाडे, रविंद्र सूर्यवंशी, सरपंच अश्विनी शिरगावे, ॲड. करुणा विमल, डॉ. स्मिता गिरी, निती उराडे, चंद्रकांत खंडाईत, सभापती प्रदिप झांबरे, डॉ. शरद शिंदे, डॉ. अशोक पाटील, आप्पासो धनवडे, अशोक देशमुख, पोपट दांगट, जितेंद्र कांबळे व पंचक्रोशीतील मान्यवर महिला युवक व नागरिक उपस्थित होते.
सुत्रसंचलन सनी गोंधळी, स्वागत व प्रास्ताविक रतन कांबळे यांनी व आभार मिलिंद गोंधळी यांनी मानले.