बुद्धरत्न भालेराव यांच्यावरील दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावे-वंचीत बहुजन आघाडी [जिवाने मारण्याची धमकी देणाऱ्या डी.वाय.एस पि पुसद आणि ठाणेदार पुसद यांच्यावरही गुन्हे दाखल करा]

143

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ) मो.9823995466

यवतमाळ (दि. 5 डिसेंबर) मागील काही दिवसापूर्वी भारतीय संविधान आणि मुस्लिम धर्माचा पवित्र धर्मग्रंथ कुराण, यावर अज्ञात समाजकंटकाने सोशल मीडियावर आपत्ती जनक टिप्पणी केली होती.

त्यामुळे मुस्लिम समाज व संंविधानवाद्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि रस्त्यावर उतरुन लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू केले.

सदर आंदोलनात वंचित बहुजन आघाडी चे पुसद तालुकाध्यक्ष बुद्धरत्न भालेराव ही सामील झाले होते.

संपूर्ण पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीमध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू होते, मोर्चेकर्यांचा उद्रेक पाहता भालेराव यांनी संयमाची भूमिका घेत सर्वांना शांत होण्याचे आवाहन केले.

उपस्थित आंदोलनकर्ते यांच्या समक्ष पोलीस अधिकार्यांना बुद्धरत्न भालेराव यांनी विनंती केली कि आपण भारतीय संविधान आणि मुस्लिम धर्माचा पवित्र धर्मग्रंथ पुराण यांच्यावर आपत्तीजनक टिप्पणी करणाऱ्या गुन्हेगारावर गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करा.
किंवा आम्हा मोर्चेकरांना गुन्हेगारास अटक करण्याचा विश्वास द्या आम्ही आमचे आंदोलन तात्काळ थांबवितो.

पोलीस प्रशासनाने गुन्हेगारास अटक करण्याचा शब्द दिला आणि आंदोलन तिथेच थांबविले प्रचंड जनसमुदाय रस्त्यावर उतरून सुद्धा आंदोलनाला कुठल्याही प्रकारचे गालबोट लागले नाही अतिशय शांततेत आंदोलन पूर्ण करून मोर्चेकरी आपापल्या घरी निघून गेले.

दुसऱ्या दिवशी पुसद शहर पोलीस स्टेशनचे बीट जमादार बुद्धरत्न भालेराव यांच्या घरी आले आणि आपल्याला डीवायएसपी साहेबांनी बोलाविले सोबत 149 ची नोटीसही दिली.

विषय काय? आहे म्हणून भालेराव हे डी वाय एस पी यांच्या दालनात त्यांना भेटण्यास गेले.
डी.वाय.एस‌पी यांनी बुद्धरत्न भालेराव यांना प्रश्न केला की आपण काय करत असता, भालेराव यांनी त्यावर उत्तर दिले की मी वंचित बहुजन आघाडीचा तालुकाध्यक्ष आहे.

याच्या व्यतिरिक्त काय करता, माझा प्रपंच चालवण्यासाठी मी एसबीआय बँकेच्या थकीत कर्जदारांच्या वसुल्या करतो त्यावर लगेच डी वाय एसपी म्हणाले तू त्या दिवशी मोर्चेकर्यांना भडकावत होता.

त्या दिवशी तुझ्यामुळे दंगल निर्माण झाली असती असा आरोप करीत त्यांच्या कर्मचाऱ्यांना सांगितले की याचा बँकेचा वसुलीचा धंदा बंद करा, बँकेत जाऊन याचे काम बंद करण्याचे सांगा, आणि यापुढे तू वंचित बहुजन आघाडीचे नाव स्वतः समोर लावू नको पक्षाच्या लेबलवर कुठलेच कार्यक्रम घेऊ नको हे सर्व तात्काळ थांबव अन्यथा तुझं मर्डर करून टाकीन, मी आयपीएस दर्जाचा पोलीस अधिकारी आहे. तुझ्यासारखे चार मर्डर केले तरी माझं काहीच वाकडं होत नाही अशी धमकी दिली. आणि भारतीय दंड संहिता कलम 110 अंतर्गत गुन्हा दाखल करून भालेराव यांना अटक केली.

हा अत्यंत भयानक प्रकार आहे वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी संबंध देशामध्ये अनेक दंगली थांबवण्याचे काम केले आणि करीतही आहेत.

जातीय व धार्मिक दंगली पेटवून स्वतःची राजकीय पोळी भाजणाऱ्या धूर्त राजकारण्यांची चाल हाणून पाडुन देशात सामाजिक सलोखा अबाधित राहावा.
या हेतूने श्रद्धेय एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर रात्रंदिवस काम करीत आहेत.
आणि आपल्या नेत्याच्या पावलावर पाऊल ठेवून पक्षाचा प्रोटोकॉल काल न मोडता पक्षाचा प्रत्येक पदाधिकारी पोट तिडकीने काम करत असतो.

वंचित बहुजन आघाडीच्या प्रत्येक आंदोलनात पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता देशाचा जागरूक नागरिक म्हणून उभा असतो, वंचितच्या कुठल्याच आंदोलनाला आतापर्यंत गालबोट लागलेला इतिहास नाही पक्षाच्या पदाधिकाऱ्याने व कार्यकर्त्यांनी कधीच आणि कुठेच कायदा मोडीत काढलेला आतापर्यंतचा इतिहास नाही.

जेव्हापासून भालेराव यांच्यावर अध्यक्ष पदाची जबाबदारी आली तेव्हापासून त्यांनी संपूर्ण पुसद तालुक्यात सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन विविध सामाजिक उपक्रम राबवित जनमानसात चांगल्या प्रकारे प्रतिमा निर्माण केलेली असतांना
गरीब शेतकरी कष्टकरी महिला अत्याच्यारांच्या घटनेला
वाचा फोडण्याचे काम केलेले आहे.

एवढी स्वच्छ प्रतिमा असून देखील या पद्धतीने डी वाय एस पी पुसद यांनी अशा पद्धतीची वागणूक का बरे दिली असेल आंबेडकरी चळवळीला संपवण्यासाठी प्रस्थापित राजकारणी पोलीस प्रशासनाचा वापर करीत आहेत की काय? अशी शंका निर्माण होणे साहजिकच आहे.

हा झालेला अपमान आणि डीवायएसपी यांची दादागिरी दाखल केलेला खोटा गुन्हा हे वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता पदाधिकारी सहन करणार नाही.

अन्याय करणाऱ्या पेक्षा आणि सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो याची प्रत्येक कार्यकर्त्याला जाण आहे.अशा पद्धतीनेच प्रत्येकाला संपवण्याचा पोलीस प्रशासनाने विडा उचलला की काय?

सामाजिक कार्याचा एवढा लेखाजोखा असताना त्याचे फळ असे मिळणार असेल तर हे आम्ही सहन करणार नाही, म्हणून दि. 4/12/2023 रोजी वंचित बहुजन आघाडी यवतमाळ जिल्ह्याच्या च्या वतीने मा. पोलीस अधीक्षक डॉ‌. पवन बनसोड यांना निवेदन देण्यात आले.

बुद्धरत्न भालेराव यांच्यावर केलेला खोटा गुन्हा तात्काळ मागे घेण्यात यावा, व अशा प्रकारची नीच व अपमानजनक वागणूक देऊन जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या डी वाय एस पी पुसद व, ठाणेदार पुसद यांच्यावर कठोर कारवाई करा..! अशा आशयाचे निवेदन जिल्हाध्यक्ष पांडुरंग मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली देण्यात आले.

बुद्धरत्न भालेराव यांच्यावरील गुन्हे मागे न घेतल्यास ठाणेदार व डी वाय एस पी यांच्यावर कारवाई न केल्यास बहुजन आघाडीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.

यावेळी वंचित बहुजन आघाडी पुसद, वंचित बहुजन आघाडी उमरखेड, वंचित बहुजन आघाडी महागाव, दारव्हा, दिग्रस,नेर, आर्णी, यवतमाळ सह पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.