मोर्शी वरूड तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी बैठक संपन्न !

85

🔸आमदार देवेंद्र भुयार यांनी पाणी पुरवठा योजनांना मंजुरी देण्याची केली मागणी !

🔸उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रस्ताव सदर करण्याचे दिले निर्देश !

✒️वरूड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मोर्शी(दि.11डिसेंबर):-वरूड तालुक्यातील पाणी पुरवठा योजनेच्या अडीअडचणी संदर्भात उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार व पाणी पुरवठा मंत्री श्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार देवेंद्र भुयार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली त्यावेळी आ. देवेंद्र भुयार यांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्यावर चर्चा करण्यात आली.

चारघड प्रकल्पा अंतर्गत मंजूर केलेल्या 23 गाव पाणी पुरवठा योजनेला चारघड प्रकल्पातील पाणी आरक्षण तात्काळ मंजूर करावे व काम लवकर चालू करावे व अत्यंत जुनी ७० गाव पानी पुरवठा योजनेत समाविष्ट असणाऱ्या इतर ३० गावाना नव्याने योजनेला मंजुरात द्यावी व स्वतंत्र किव्हा प्रादेशिक योजनेचा डीपिआर मंजुराती साठी सादर करावा व शासनाने मान्यता द्यावी.पाक प्रकल्पा अंतर्गत मंजूर केलेली ५ गाव पाणी पुरवठा योजनेला डबल क्षमतेचे सोलर यंत्र व सोलर पंप लावून पाणी आरक्षण मंजूर करून काम चालू करावे व स्थानिक सरपंच व गावकरी यांना विश्वासात घेऊन काम चालू करावे.

पंढरी प्रकल्पा अंतर्गत मंजूर असलेले ३५ गाव पाणी पुरवठ्याच्या डीपिआर चुकीच्या पद्धतीने तयार केला त्या डिपिआर मध्ये सुधारणा करून, कंत्राटदाराणे पंढरी प्रकल्पाच्या उपदव्वा पासून ग्रामीण रस्त्याच्या दुतर्फा नालीमध्ये टाकलेली ४५ किमी ची पाईप लाईन काढून टाकावी पाण्याला पूर्ण ग्र्यावेटी मिळेल अशी पाईप लाइन नव्याने टाकण्यात यावी, डबल क्षमतेचे सोलर सिस्टिम व सोलर पंप लावण्यात यावे, व ३५ गावातील नागरिकांना मोफत आणि फिल्टर चे शुद्ध पाणी देण्यासाठी रिवाईज डीपिआर व अंदाजपत्रका मध्ये सुधारणा करावी व शासनाकडे मान्यतेसाठी डिपीआर सादर करावा.

मोर्शी तालुक्यातील दुर्गवाडा, पार्डी, नशिरपूर, शिंभोरा, येवती, पिंपळखुंटा, पिंपळखुंटा लहान, निंभी, तळणी, येरला, इनापूर, आसोना इत्यादी गावाची झिरो विजेवर व झिरो खर्चावर चालणारी सोलर यंत्र असलेली प्रादेशिक पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात यावी.मोर्शी तालुक्यसाठी स्वतंत्र हिवरखेड, डोंगरयावली, घोडदेव, पाळा, सालबर्डी, भिवकुंडी, भाईपुर, लाडकी,मायवाडी इत्यादी स्वतंत्र योजना निर्माण करून प्रत्येक गावात विहीर, सोलर पंप, पाइपलाइन, गावा मधील पाईप लाइन, नवीन टाकी, स्मशानभूमी, शाळा, अंगणवाडी पर्यन्त पाइपलाइन टाकण्यात यावी.

वरुड तालुक्यातील पुसला व लोणी गावासाठी स्वतंत्र नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर करून पंढरी व लोणी साठी अप्पर वर्धा धरणावर आरक्षण मंजूर करण्यात यावे तसेच धानोडी,जामगाव महेंद्री, जामठी, उदापुर, पिपलागढ, खापरखेडा, शिंगोरी, भेमडी लहान, पिंपळ शेंडा इत्यादी गावांसाठी नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात यावी.जिल्हा परिषद अंतर्गत वरुड मोर्शी तालुक्यातील सध्या स्थितीत चालू असलेल्या पाणी पुरवठा योजनेवर सोलर पंप बसविण्यात यावे व पाणी पुरवठा योजनेवरचा वीज बिलाचा खर्च शून्य करण्यात यावा.

वरुड मोर्शी तालुक्यातील सदर योजनेचे डीपीआर व आराखडा तयार करून व्यय व अग्रक्रम समिती समोर ठेऊन मान्यता घेण्यात यावी व काही योजनेचा खर्च वाढल्यामुळे योजनेला सुप्रमा देऊन अंदाजपत्रक व आराखडे रिवाईज करण्यात यावे यासह आदी विषया बाबत आमदार देवेंद्र भुयार यांनी विविध मुद्दे मांडून मोर्शी वरूड तालुक्यातील प्रश्न मार्गी लावण्याची मागणी रेटून धरली त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरूड मोर्शी तालुक्यातील संपूर्ण कामांचे परिपूर्ण प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी बैठकीला उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार व पाणी पुरवठा मंत्री श्री गुलाबराव पाटील, आमदर देवेंद्र भुयार, आ.डॉ किरण लहमाटे, आ इंद्रनील नाईक, आ राजू कारेमोरे, आ चांड्रीकापुरे, वित्त विभागाचे सचिव, नियोजन विभागाचे सचिव, पाणी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव, ग्रामविकास विभागाचे सचिव, यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी, मान्यवर मंडळी उपस्थित होती.