काश्यपीने पटकावला शिवकालीन मर्दानी कला क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक

116

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

यवतमाळ(दि.11डिसेंबर):- जिल्ह्याची नुकतीच जील्हा स्तरीय शालेय स्पर्धा शिवकालीन मर्दानी कला (अश्टे- डू – मर्दानी आखाडा) क्रीडा स्पर्धा 2023-24 यवतमाळ येथील नेहरू स्टेडियम येथे दि. 8/ 12 ला घेण्यात आली होती.

या स्पर्धेत यवतमाळ येथील उज्वल नगर मध्ये राहणारी सनराईज इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये 7 वर्गात शिक्षण असलेली “काश्यपी विनोद दोंदल” हिने शिवकला (लाठीकाठी) या खेळ प्रकारात गटात 14 वर्षा खालील, 35 किलो वजन आतील गटात प्रथम क्रमांक पटकावला.

काश्यपी याचे सम्पूर्ण श्रेय वडील विनोद दोंदल, आई कीर्ती दोंदल, प्रशिक्षक प्रितम सर, सोनवणे करीत आहेत. त्याच बरोबर सनराईज इंग्लिश मिडीयम स्कुल चे संस्थापक मुख्याध्यापक दिनेश पवार सर, उपमुख्याध्यापक स्मिती देशमुख, वर्ग शिक्षिका निधी मॅडम, क्रीडा शिक्षक प्रतीक खुजे, सागर रेकवार इत्यादी शिक्षक वृंद वेळोवेळी मार्गदर्शन करीन सहकार्य करीत राहतात

काश्यपी सोबत शिवकालीन मर्दानी कलेचे अभ्यास घेणारे सर्व मुले-मुली सहकार्य करत असतात, काश्यपीने मिळवलेल्या नाविन्यपूर्ण यशा बद्दल सर्वत्र कौतुक होत असून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.